महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! रेल्वेच्या शौचालयात आढळली दीड महिन्यांची चिमुकली; मनमाड रेल्वे पोलिसात तक्रार दाखल - Baby Girl Found In Train - BABY GIRL FOUND IN TRAIN

Baby Girl Found In Train Toilet : लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसच्या शौचालयात दीड महिन्याची चिमुकली सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.

one and half month baby girl found in Devgiri Express, complaint filed in Railway Police Station Manmad
प्रतिकात्मक फोटो (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 12:15 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Baby Girl Found In Train Toilet : लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री अंदाजे एक ते दीड महिन्याची चिमुकली शौचालयात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मनमाड येथे गाडी पोहोचताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गाडीमध्ये या बाळासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, कोणीही त्याची जबाबदारी घेतली नसल्यानं अखेर रेल्वे पोलीस ठाणे, मनमाड येथे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

रेल्वेत सापडली लहान मुलगी :नांदेड येथून लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असणारे अयलया बुकीया राजिया यांनी तक्रारीत म्हटलंय की, ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजेपासून ट्रेन नं 17058 अप लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये A/1, A/2, A/3, H/1, B/4 या कोचमध्ये त्यांची ड्यूटी होती. सदर गाडी छत्रपती संभाजीनगर येथून निघाल्यानंतर A/3 कोच मधील सीट नं 45 वरील प्रवाशानं मला येऊन घटनेची माहिती दिली. तेथे जाऊन चौकशी केली असता रेल्वेच्या शौचालयात एक-दीड महिन्याची बेवारस चिमुकली आढळली.

मनमाड येथे तक्रार दाखल : अयलया बुकीया राजिया यांनी घडलेल्या घटनेची माहिती नांदेड येथील रेल्वे कमर्शियल कंट्रोल रुमला कळवली. त्यानंतर रेल्वे स्टेशन मनमाड येथे GRP आणि RPF यांना ट्रेन अटेंड करण्याबाबत सांगण्यात आलं. सदर गाडी रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर GRP यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तर पोलीस सध्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा -

  1. साईनाथ रुग्णालयातील डस्टबिनमध्ये स्त्री जातीचं मृत अर्भक आढळल्यानं खळबळ - Female Infant Found
  2. माता न तू वैरिणी : निर्दयी मातेनं पोत्यात घालून फेकलं अर्भक, कपिलधार परिसरात खळबळ
  3. नदीच्या पात्राजवळ सापडलं अर्भक; चालकानं दिलं जीवदान

ABOUT THE AUTHOR

...view details