महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हर घर नल, योजनेत भ्रष्टाचार; ‘पाणी नाही तर मत नाही’, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : मुरबाड तालुक्यातील नागरिक पाण्याच्या टंचाईनं त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात ही समस्या जास्तच तीव्र झालीय. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिलाय.

Thane News
'हर घर नल, योजनेत भ्रष्ट्राचा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 10:15 PM IST

'हर घर नल, योजनेत भ्रष्ट्राचार

ठाणे Lok Sabha Election 2024 : मुरबाड तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींना मोदी सरकारच्या 'हर घर नल, हर घर जल' (Har Ghar Nal Yojana) अभियानात शासनानं २०० पाणीपुरवठा योजनांसाठी १७३ कोटीचा निधी मंजूर करूनही आज काही ग्रामपंचायती मधील 'हर घर जल' योजना कायदावरच असल्यानं या गाव पाड्यात पाणी टंचाईनं उग्ररूप धारण केलंय. विशेष म्हणजे ही गावे भाजपाचे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपाचेच आमदार किसन कथोरे यांच्या मतदारसंघात येतात. आज तालुक्यातील फणसोली येथील शेकडो महिलांनी एकत्र येत मुरबाड पाणी पुरवठा विभागाच्या कार्यलयावर मोर्चा काढला. जल जीवन योजनेतील भष्ट्र्चाराची चौकशी करून ग्रामस्थांना पाणी टंचाई पासून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं देखील जाहीर केलंय.

१५ दिवसांनी होतो पाणी पुरवठा : मुरबाड तालुक्यापासून दोन किमी अंतरावर बारवी डॅमच्या मागील पाणी सोत्र, दोन किमी अंतरावर असलेल्या परिसरात फणसोली ग्रामपंचात असून येथील लोकसंख्या ७५० च्या जवळपास आहे. या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कोले, वडखळ आणि सुकाळवाडी हे दोन आदिवासी वस्त्या बारवी प्रकल्प बाधित असून त्यांना स्वतंत्र पाणी योजना शासनानं मंजूर केलीय. मात्र, या आदिवासी गाव पाड्याच्या पाणी पुरवठा करणारी विहीर बारवी धरण बुडीत श्रेत्रात खोदकाम करणं सुरू केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे फणसोली जल जीवन योजनामध्ये फणसोली लोहार पाडा, कातकरी वस्तीचा समावेश आहे. यासाठी लाखों रुपयाची योजना पूर्ण असल्याचं दाखवून ठेकेदारानं रक्कम काढल्याचा आरोप, ग्रामस्थ महेश कोळेकर यांनी केलाय. तसेच गावात १५ दिवसांनी काही वेळासाठी पाणी पुरवठा केला जातोय. मात्र, तेही दूषित पाणी असल्याचं गावकरी महिला सांगतात. या दूषित पाण्यामुळं लहान मुलं वयोवृद्धचं आरोग्य धोक्यात आलंय.



पाणी टंचाई अधिक तीव्र: मुरबाड तालुक्यात २००५ ते २०१० कालावधीत तब्बल १८९ पाणीपुरवठा योजना राबवल्या होत्या. परंतु काही ठेकेदारांवर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्याची चौकशी स्थानिक स्तरावर दडपण्यास ठेकेदारांना यश आल्याची तालुक्यात रंगलीय. दुसरीकडं तक्रारदार अधिकारीही थंडावल्यानं मुरबाड तालुक्याची पाणी टंचाई अधिक तीव्र बनली. वाड्या-पाड्यांमधील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी पुन्हा २०० योजना तालुक्यात मंजूर झाल्या. त्यासाठी १७३ कोटी रुपये अनुदान अदा करण्यात आलं. मात्र, ठेकेदारांनी अद्यापही कामे पूर्ण केली नसल्यानं पुन्हा मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईत महिला वर्ग हैराण झाले आहेत. ज्याठिकाणी ४० योजना पूर्ण झाल्या तेथेही नळाद्वारे पाणीपुरवठा होतो किंवा नाही याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना अद्यापही माहिती नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

मतदानावर बहिष्कार :योजना कागदावरच राहिल्या असून, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय. दरम्यान, मोर्चाकरी महिलांची पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी समजूत काढून जोपर्यत पाण्याची टंचाई असेल तोपर्यंत गावात टँकरनं पाणी पुरवठा करणार असल्याचं लेखी आश्वसन दिलंय. मात्र, त्यानंतर महिलांनी मोर्चची सांगता केली.


हेही वाचा -

  1. ‘हर घर नल’ योजना रुतली भ्रष्टाचाराच्या दलदलीत; अधिकारी ठेकेदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
  2. Jal jeevan Mission in Pune : ग्रामीण भागातील नागरी सुविधांची उणीव दोन वर्षात भरून काढू - चंद्रकांत पाटील
  3. Jal Jeevan Mission: 'जल जीवन मिशन', 'हर घर नल जल योजने'चा गौराईपुढे साकारला आकर्षक देखावा

ABOUT THE AUTHOR

...view details