नागपूर CBI Arrests NHAI Officer In Bribery Case : केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) नागपुरात 20 लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) महाव्यवस्थापकाला अटक केलीय. प्रकल्प संचालकपदाची जबाबदारीही सांभाळणारे अरविंद काळे यांनी खासगी कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर रविवारी (3 मार्च) त्यांना अटक केलीय.
20 लाखांच्या लाचेसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त : काळे यांच्या अटकेनंतर केलेल्या शोध मोहिमेत सीबीआयनं 20 लाखांच्या लाचेसह 45 लाख रुपये जप्त केल्याचंही यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे आणि अन्य 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेच्या अटकेनंतर तपास केला असता 20 लाखांच्या लाचेसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
खासगी कंपनीकडून लाच मागितल्याप्रकरणी अटक : गेल्या काही महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी सर्वात मोठी अटक आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सीबीआयने रेल्वेचे उपमुख्य अभियंता, एनएचएआयचे उपमहाव्यवस्थापक आणि इतर काही जणांना लाच प्रकरणात अटक केली होती. मध्य प्रदेशातील रस्ते, पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतलेल्या एका खासगी कंपनीकडून लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने सापळा रचून या प्रकरणी हबीबगंज, भोपाळ येथे कारवाई करण्यात आली होती.
रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्याकडून लाच मागितल्याचा आरोप : तैनात पश्चिम मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता आणि कटनी येथे तैनात असलेल्या डीजीएम एनएचएआयला अटक केली होती. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि 30 रेल्वे ओव्हर ब्रिज बांधणे यांचाही समावेश आहे. डिझाईनची मंजुरी आणि काम सुरू करण्याची परवानगी, सदर ठेकेदाराची थकबाकी, बिलं पास करणं यासंबंधी प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक अधिकारी रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्याकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.