महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माता न तू वैरिणी : निर्दयी मातेनं पोत्यात घालून फेकलं अर्भक, कपिलधार परिसरात खळबळ - निर्दयी मातेचा शोध सुरू

New Born Child Found : बीडमधील कपिलधार परिसरात फिरायला गेलेल्या मांजरसुंबा इथल्या तरुणांना पोत्यात गुंडाळलेलं अर्भक मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली. या तरुणांनी तत्काळ याबाबतची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या निर्दयी मातेचा शोध सुरू केला आहे.

New Born Child Found
अर्भकासोबत परिचारिका आणि पोलीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 10:13 AM IST

बीड New Born Child Found : अनैतिक संबंधातून जन्माला आलेला चिमुकला अज्ञात मातेनं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना कपिलधार इथं उघडकीस आली आहे. कपिलधार इथं फिरायला गेलेल्या काही तरुणांना हा चिमुकला पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळं त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, या चिमुकल्याला नेकनूरच्या शासकीय स्त्री रुग्णालयात प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलं अर्भक :मांजरसुंबा गावातील चार ते पाच तरुण कपिलधार इथं फिरायला गेले होते. यावेळी त्यांना पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत चार ते पाच दिवसाचं अर्भक दिसून आलं. या तरुणांनी तत्काळ नेकनूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. नेकनूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर दाखल होत चौकशी केली. यावेळी पोलिसांना चार ते पाच दिवसाचं अर्भक पोत्यात गुंडाळून ठेवल्याचं दिसून आलं.

अनैतिक संबंधांतून अर्भक जन्मल्याचा संशय :पोलिसांनी घटनास्थळावर शोध घेतला असता, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळून आली नाही. त्यामुळं पोलिसांनी या अर्भकाला अगोदर नेकनूर इथल्या शासकीय स्त्री रुग्णालयात प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांनी त्या अर्भकाला बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी या अर्भकाला असं पोत्यात घालून फेकल्याची चर्चा करण्यात येत आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस पुढील तपास करत असून अर्भकाला फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात कचराकुंडीत सापडलं एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक
  2. कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह, मुंबईच्या सायन रुग्णालयातील घटना
  3. Baby Thrown In Bush: चार दिवसांचे अर्भक तोंडात बोळा कोंबून फेकले, क्रूर आई-वडिलांचा तपास सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details