मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी कुर्ला कोहिनूर परिसरात थार कारच्या अपघातात समीर खान जखमी झाले होते. यानंतर ते बरेच दिवस आयसीयूमध्ये होते.
मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर :नवाब मलिक यांनी सोशल मिडिया एक्सवरुन पोस्ट शेअर करत समीर खान यांच्या मृत्यूची माहिती दिलीय. नवाब मलिक हे 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
"माझे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. समीर यांच्या जाण्यानं आमच्या परिवाराचं मोठं नुकसान झालं आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत," असं नवाब मलिक यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
कसा घडला अपघात? : समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघं अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कुर्ला पश्चिम कोहिनूर येथील क्रिटीकेअर रुग्णालयात गेले होते. तपासणी झाल्यानंतर दोघंही बाहेर आले होते. यानंतर समीर यांनी ड्रायवरला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. अपघातात समीर खान गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला, खांद्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. समीर खान यांची पत्नी निलोफर ही देखील या अपघातात किरकोळ जखमी झाली होती.
हेही वाचा
- बंडखोरीमुळं भाजपाची वाढली डोकेदुखी; अकोला पश्चिममध्ये बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न
- "महिलांना दरमहा 2100 रुपये, तर दोन मोफत गॅस सिलेंडर...", झारखंड निवडणुकीसाठी भाजपाचं 'संकल्प पत्र' जारी
- नाशिकमध्ये मनसेच्या इंजिनला ब्रेक लागणार, वाचा काय आहे कारण...