नाशिक- जिल्ह्यातील इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे. नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन सर्वजण धरणावर फिरण्यासाठी आले होते. 21 मे रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे.
फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा पाण्याचा अंदाज चुकला, पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू - Nashik drowning incident
इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घटना घडली आहे.
Published : May 22, 2024, 7:05 AM IST
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड भागातील गोरेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तरुण, तरुणी रिक्षाने इगतपुरी येथील भावली धरणावर फिरण्यासाठी आले. अशात सगळे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांना माहिती मिळताच स्थनिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. हनीफ शेख (वय 24), अनस खान (वय 15), नासिया खान ( वय 15 ), मिजबाह खान (वय 16) आणि ईकरा खान (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व गोसावी वाडी नाशिक रोड परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार तिघे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी दोघांनी धाव घेतली. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वांचाच मृत्यू झाला. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी इगतपुरीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आले आहे.