महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात जोडप्यानं लग्नाच्या ड्रेसमध्येच केली आत्महत्या; सोशल मीडियावर व्हिडिओ ठेवून दिला शेवटचा मेसेज - NAGPUR SUICIDE NEWS

नागपुरात एका जोडप्यानं लग्नाच्या ड्रेसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Nagpur Suicide News
दाम्पत्याने केली आत्महत्या (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 6:28 PM IST

नागपूर : नागपूर शहरतील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगर परिसरात एका दाम्पत्यानं घरीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जेरील मनक्रीप आणि ऍनी मनक्रीप असं आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी दाम्पत्यानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

सुसाईड नोट लिहिली : घरातील परिस्थिती आणि आर्थिक अडचणीतून मनक्रीप दाम्पत्यानं आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं असून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात त्यांनी आत्महत्येसाठी कुणालाचं जबाबदारी धरू नये, आमच्यावर कुणाचा दबाव नसल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर (ETV Bharat Reporter)


वेडिंग गाऊनमध्ये केली आत्महत्या : सोमवारी जेरील मनक्रीप आणि ऐनी मनक्रीप यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो व्हिडिओ स्वतःच्या व्हाट्सएपच्या स्टेटसला ठेऊन आत्महत्या केली. ऍनीनं वेडिंग गाऊनमध्येच आत्महत्या केली.


सुसाईड नोट जप्त, तपास सुरू :घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यात परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. आत्महत्येपूर्वी मनक्रीप त्या दाम्पत्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. जेरील मनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचं काम करत होते तर पत्नी ऍनी या हाऊसवाईफ होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला आहे असं पोलिसांनी सांगितलं.

सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या : या आधीही अशीच एक घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली होती. शहरातील रिक्षाचालक तरुणाने पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत राहत्या घरात आत्महत्या केली होती. रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित रिक्षाचालक तरुणानं आत्महत्या केली होती.



हेही वाचा -

  1. माझ्या मुलीला सांभाळा...,सावकारी जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्याच्या बाळासह महिला डॉक्टरची आत्महत्या - Female doctor suicide
  3. धक्कादायक! वडिलांसह 4 मुलींची आत्महत्या, दिल्लीतील रंगपुरी भागातील घटना - Father Suicide with 4 Daughters

ABOUT THE AUTHOR

...view details