मुंबई : गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोनही शिवसेनेचे मुंबईत मिळावे झाले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा झाला. तर, अंधेरी येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा झाला. या दोन्ही मेळाव्यांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या या स्वबळाच्या नाऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी टीका केली. स्वबळावर लढण्यासाठी आपल्याकडे ताकद असावी लागते. घरात बसून निवडणुका लढता येत नाहीत. अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे हे काही शिवसेना पक्षाचे प्रमुख नाहीत किंवा ते शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे वारसदार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांची कंपनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या भीतीने पळालेली आहे. यांना ईडी, सीबीआयचे अधिकारी अटक करतील अशी भीती होती. त्यामुळे हे लोक पळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, "या माणसाने कधी एक तरी पुस्तक वाचलं आहे का? पेपर तरी वाचतो का हा माणूस?"
पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तुमच्यासारखी लाचारी पत्करलेली नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. अमित शाह आणि मोदींची लाचारी करणं म्हणजे औरंगजेबासमोर मुजरे घालण्यासारखे आहे. तुम्ही इथे कायमस्वरूपी नाहीत. ज्या लोकांनी तुम्हाला पदं दिली तेच लोक उद्या तुमची पदं काढून घेतील आणि जे लोक आज तुमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत उद्या तेच लोक तुमच्या उरावर बसतील. आमच्या दंडात दम नाही म्हणता? आधी तुमच्या चड्डीचा नाडा सांभाळा. तुमच्या चड्डीचा नाडा दिल्लीवाल्यांच्या हाती आहे. तुमच्या चड्डीचा नाडा दिल्लीवाले कधीही खेचतील तेव्हा तुम्ही नागडे व्हाल, असा इशाराच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
हेही वाचा...
'दिल्लीला कोण जास्त मोठी थैली देते, त्यावरुन नेत्यांचं वजन ठरते'; संजय राऊतांचा हल्लाबोल