महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा - Nagpur Lok Sabha Vote Counting

Nagpur Lok Sabha Vote Counting : विदर्भातील प्रमुख लढतींपैकी प्रमुख असलेल्या नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट यार्ड परिसरात तयारी देखील आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर सातत्याने तयारीचा आढावा घेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनही दक्ष झाले आहे.

Nagpur Lok Sabha Vote Counting
डॉ. विपीन इटनकर मतमोजणी केंद्राची पाहणी करताना (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 10:56 PM IST

नागपूरNagpur Lok Sabha Vote Counting :नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या येत्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबल १० अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.


नागपूर, रामटेक लोकसभेसाठी १२० टेबल :ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर आणि रामटेकसाठी प्रत्येकी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे ६ हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल. सहा विधानसभेनुसार प्रत्येक विधानसभेसाठी २० असे एकूण एका लोकसभा मतदारसंघासाठी १२० टेबल लागतील. म्हणजेच नागपूर आणि रामटेकसाठी एकूण २४० टेबल आणि पोस्टल बॅलेटचे दहा असे एकूण २५० टेबलवर दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी होईल.

नागपूरसाठी २० तर रामटेकसाठी २६ फेऱ्यांची प्रतीक्षा :नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात होणार आहे. नागपूर लोकसभेचा निकाल २० व्या फेरीत तर रामटेक निकालासाठी २६व्या फेरीची प्रतीक्षा ही करावी लागेल. प्रत्येक टेबलसाठी एक काउंटिंग सुपरवायझर, एक असिस्टंट आणि एक मायक्रो ऑबजरवर राहतील. यासोबतच उमेदवारांचे प्रतिनिधीसुद्धा असतील.

कामठीच्या मतमोजणीसाठी सर्वाधिक २६ फेऱ्या : यावेळी विधानसभा निहाय मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक विधानसभेतील मतदान केंद्रानुसार मतमोजणी होईल. रामटेकमध्ये कामठी विधानसभेत एकूण ५०८ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे कामठीतील मतमोजणीसाठी सर्वाधिक २६ फेऱ्या होणार आहेत. तर नागपुरातील मध्य नागपूर विधानसभेत सर्वांत कमी ३०५ मतदान केंद्र असल्याने सर्वांत कमी म्हणजे १६ फेऱ्या लागतील.

२४ हजार ८३७ इतके मतदार वाढले:यावेळी मतदानचे प्रमाण कमी झाले असले तरी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा २४ हजार ८३७ इतके मतदार वाढले आहेत.


नागपूरात ५४.३० तर रामटेकमध्ये ६१ टक्के मतदान :नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ५४.३० तर रामटेक लोकसभेसाठी ६१ टक्के मतदान झाले. दक्षिण पश्चिममध्ये ५२.९४ टक्के तर दक्षिण ५३.९५ टक्के, पूर्व ५५.७८ टक्के, मध्य ५४.६ टक्के, नागपूर पश्चिम ५३.७३, उत्तर ५५.२० टक्के एवढे मतदान झाले. याची एकूण सरासरी ५४.३० टक्के एवढी आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के एवढे मतदान झाले. काटोल ६१.९६ टक्के, सावनेर ६१.४४, हिंगणा ५४.१६ टक्के, उमरेड ६७.१६ टक्के, कामठी ४८.६९ टक्के आणि रामटेक ६६.३७ टक्के एवढे मतदान झाले आहे.

हेही वाचा :

  1. पेन्शनसाठी हयातीचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Old Woman Dies Case Miraj
  2. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अखेर ससूनचे डीन सक्तीच्या रजेवर, रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणारे डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित - Pune Porsche Accident Case
  3. मुख्यमंत्र्यांच्या कायदेशीर नोटीसला संजय राऊतांचं उत्तर, 'अब आयेगा मजा' - Eknath Shinde notice to Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details