मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 16 जानेवारीला कारवाई केली, त्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयानं चार किलो सोने जप्त केलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्याममध्ये 17 जानेवारीला दोन कोटी 59 लाखांचं तस्करी करून, मुंबईत आणलेलं सोनं जप्त करण्यात आलं. तसंच, दोन प्रमुख व्यक्तींना अटक करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला यश आलं.
सोनं तस्करी साखळीतील एक महत्त्वाचा दुवा : DRI ला दोन सोनं तस्करी करणाऱ्या प्रमुख व्यक्तींना अहमदाबाद येथील एका हॉटेलमधून अटक करून सोन्याच्या या तस्करीत गुंतलेल्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं. अटक करण्यात आलेले आरोपी हे प्रमुख हस्तक आहेत. ज्यांनी तस्करीचं सोनं घेऊन जाणाऱ्या संदर्भात आणि ते सोनं कोणास द्यायचे याबाबत नियोजन केलं होतं. त्यामुळे सोनं तस्करी साखळीतील एक महत्त्वाचा दुवा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे.
1962 च्या तरतुदींनुसार रक्कम जप्त : कारवाईच्या दिवशी 16 जानेवारीला डीआरआयने यापूर्वीच जप्त केलेलं 4 किलो तस्करी केलेले सोनं घेण्यासाठी विमानतळाबाहेर वाट पाहणारे प्रमुख सदस्य होते. एका हँडलरकडून 5 लाख 21 हजारची रक्कमदेखील जप्त करण्यात आली. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार तस्करी केलेल्या सोन्याची रक्कम म्हणून जप्त करण्यात आली.
6 जणांना अटक करण्यात आली : 17 जानेवारी रोजी अटक करण्यात आलेले हे हँडलर होते. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर अहमदाबादहून मुंबईत आणलं गेलं. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्यांना 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तात्काळ या प्रकरणात, डीआरआय सोन्याच्या तस्करीच्या सिंडिकेटचे अनेक स्तर उघडण्यात यशस्वीपणे यश आलं. सध्या डीआरआय ही सिंडिकेटला नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनं तस्करीच्या साखळीतील इतर संभाव्य दुवे शोधत आहे. याप्रकरणी आतापर्यंत मुंबई आणि अहमदाबादमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.