महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बनं उडवण्याची धमकी; रशियन भाषेत आला ई-मेल, तपास सुरू - RBI BOMB THREAT

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा ई-मेल आला आहे. हा ई-मेल रशियन भाषेत असल्याचं सांगितलं जात आहे.

mumbai rbi receives bomb threat email in russian language, police filed case
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बनं उडवण्याची धमकी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2024, 11:26 AM IST

Updated : Dec 13, 2024, 11:37 AM IST

मुंबई : देशातील शाळांना आणि संस्थांना मिळणाऱ्या धमकीचे फोन कॉल आणि ई-मेल येण्याचं सत्र थांबेनासं झालंय. एअरलाइन्स आणि शाळांनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल (RBI Receives Bomb Threat Email) आलाय. या ई-मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

आरबीआय अधिकाऱ्यांच्या ई-मेल आयडीवर रशियन भाषेत हा ई-मेल पाठविण्यात आलाय. ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गेल्या महिन्यातही मिळाली होती धमकी : यापूर्वी गेल्या महिन्यात 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर धमकीचा फोन (Threatening Call To RBI) आला होता. फोनवरील व्यक्तीनं तो 'लष्कर-ए-तोयबा'चा सीईओ असल्याचं सांगत मागचा रस्ता बंद करा, अशी मागणी केली. इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणून फोन ठेवला. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीनुसार माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता.

दिल्लीतील चार शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी :दुसरीकडंदिल्लीतील 4 शाळांना देखील आज (13 डिसेंबर) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी ई-मेल करुन देण्यात आली आहे. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळं ही धमकी खोटी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. दिल्लीतील चार शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी ; राजधानीतील चिमुकल्यांना पुन्हा हादरा
  2. दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांना पाठवलं परत, पालक हादरले
  3. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, धक्कादायक कारण आलं समोर
Last Updated : Dec 13, 2024, 11:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details