मुंबई Mumbai Local Latest Updates : मुंबईसह उपनगरात सोमवारी (8 जुलै) पावसामुळं दाणादाण उडाली होती. यामुळं रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आज (9 जुलै) पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळं सध्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सेवा वेळेवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, असं असलं तरी हवामान विभागानं दिलेला रेड अलर्ट अद्यापही कायम आहे.
मुंबईत पावसाची विश्रांती मात्र रेड अलर्ट कायम; जाणून घ्या लोकलचे अपडेट काय? - Mumbai Rain - MUMBAI RAIN
Mumbai Local Latest Updates : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अखेर विश्रांती घेतलीय. यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. तसंच मुंबई उपनगरातही पावसानं विश्रांती घेतल्यानं रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक हळू-हळू पूर्ववत होत आहे.

Published : Jul 9, 2024, 12:18 PM IST
लोकलसेवा पूर्वपदावर : ठाणे ते कल्याणच्या दिशेनं आणि सीएसटीच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व रेल्वेसेवा सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. तसंच ठाणे ते वाशी आणि पनवेलला जाणाऱ्या हार्बर रेल्वेवरील वाहतूकही वेळेनुसार धावत आहेत. तर सीएसएमटीहून पनवेलकडं जाणाऱ्या लोकल काही मिनिटं उशीरानं धावत आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकापेक्षा 2-3 मिनिटं उशिरानं धावत असून हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत.
हेही वाचा -
- पावसानं उडवली दाणादाण ; कुठं शाळा बंद, कुठं अडकले मंत्री, जोरदार पावसाचा चाकरमान्यांना फटका - IMD Issues Red Alert
- मुंबईच्या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही बसला फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास - Mumbai Rain
- मुंबईत सहा तासात 300 मिलिमीटर पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Mumbai Rain