मुंबई : सोने-चांदी व्यापाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी लोकमान्य टिळक एल. टी मार्ग पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. 76 लाख रुपये किमतीचा चांदीचा कच्चा माल दिल्यास, मी शुद्ध चांदीमध्ये परत देतो असं, आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु, तसं न झाल्यानं व्यापाऱ्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. मकरंद परिहार असे फसवणूक झालेल्या व्यापाराचं नाव आहे.
कारखान्यातूनही गायब :पोलीस सूत्राच्या माहितीनुसारपरिहार हे गेल्या 8 महिन्यांपासून सोनी याच्यासोबत वावरत होते. आरोपी हा चांदीचं शुद्ध करण्याचं काम करतो. 5 डिसेंबर रोजी परिहार यांनी सोनीला 68 किलो 174 ग्रॅम शुद्ध चांदी दिली. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी परिहार यांनी कुमार याला 55 किलो 855 ग्रॅम शुद्ध चांदी दिली. कुमार हा चांदी शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्याचा मालक आहे. परिहार यांनी ही चांदी कुमार याला रिफायनरीसाठी दिली होती. ही चांदी देताना परमार यांनी त्यासाठी चलान तयार केलं. त्यावर कुमार यांची सहीदेखील घेतली.
परतीचं आश्वासन पूर्ण केलं नाही-चांदीच्या बदल्यात कंपन्यांमधील NIBR आणि NM च्या ट्रेडमार्कच्या शुद्ध चांदीच्या विटा 2 ते 3 दिवसांत द्यायला हव्या होत्या. मात्र, 8 ते 10 दिवस उलटूनही कुमारने परिहार यांना चांदी परत केली नाही. त्यानंतर त्यांनी कुमारला फोन करून विचारणा केली. तेव्हा कुमारनं लवकरच परत करू असं सांगितलं. काही दिवसांनी परिहार कुमारच्या फॅक्टरीत गेले होते. पण तो तिथे नव्हता. कारखान्यात उपस्थित लोकांनी सांगितलं की, कुमार काही दिवसांपासून कारखान्यात आलेला नाही.
फोन बंद केला : परिहारने कुमार याच्याशी चांदीची मागणी करण्यासाठी फोनवर संपर्क साधला. मात्र, कुमारनं त्याचा मोबाइल बंद केला. कुमारचा मोबाईल बंद होताच परिहार यांनी एलटी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. परिहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुमारला बोरिवली पूर्व येथून ताब्यात घेतल. कुमारची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यानं पोलिसांना सहकार्य केलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एल. टी मार्ग पोलिसांनी रमेश कुमारला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली.