महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीचा विभक्त राहणाऱ्या पत्नीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला, जमावाला घाबरून केला आत्महत्येचा प्रयत्न - Husband Attack On Wife - HUSBAND ATTACK ON WIFE

Husband Attack On Wife : पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीनं भररस्त्यात जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना आज (5 ऑगस्ट) दक्षिण मुंबईतील गिरणगाव परिसरात घडली. यानंतर पतीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोघाही जखमींना जमावानं एका रुग्णालयात दाखल केलं. व्ही. पी. रोड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Husband Attack On Wife
पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 9:56 PM IST

मुंबईHusband Attack On Wife : दक्षिण मुंबईतील गिरणगावातील खाडिलकर रोडवर आज (5 ऑगस्ट) सकाळी 9.30 ते 10 वाजताच्या दरम्यान पतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली आहे. स्थानिक लोकांच्या जमावाला घाबरून आरोपी पतीनं स्वतःवरदेखील हल्ला केला. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती व्हीपी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न :दक्षिण मुंबईतल्या गिरगावमध्ये दिवसाढवळ्या 30 वर्षीय शीतल नामक महिलेवर 32 वर्षीय सूरजनं जीवघेणा हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे महिलेवर वार करणाऱ्या सूरजला जमावानं पकडलं. म्हणून घाबरलेल्या सूरजनं आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो रक्तबंबाळ झाला होता. तर सूरजने शीतलच्या मानेखाली शस्त्राने वार केले होते.

पतीला सोडून गेली पत्नी:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12 वर्षांपूर्वी शीतल आणि सूरज यांचा विवाह झाला होता. या दोघांना एक 10 वर्षांचा मुलगा आहे. दोघे मुलासह विरार येथे राहत होते. मात्र, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीला संशय होता. म्हणून त्या कारणास्तव शीतल सूरजपासून एका महिन्यापासून विभक्त झाली होती. नालासोपारा येथे माहेरी राहण्यास गेली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सूरजनं आज सकाळी शीतलचा पाठलाग करत गिरगाव गाठलं. शीतल ट्रेननं नालासोपारा येथून गिरगावातील खाडिलकर रोडवर असलेल्या कार्यालयात येत होती. दरम्यान, त्याने तिला रस्त्यात गाठून हल्ला चढविला.

  • दोघेही रुग्णालयात दाखल :हल्ल्यानंतर सूरज आणि शीतलला रक्तबंबाळ अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हीपी रोड पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा :

  1. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घराच एकटी असताना केला वार
  2. जेवणाच्या वादातून सहकाऱ्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला; हल्लेखोर सहकाऱ्याला अटक - Thane crime
  3. जेवण, दारू आणण्यास उशीर झाल्यानं गुंडांचा पारा चढला; हॉटेल स्टाफवर केला चॉपरनं हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details