मुंबई Mumbai Cops Receives Bomb Threat : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) इथं आरडीएक्स ठेवल्याचा शुक्रवारी कॉल आल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र हा हॉक्स कॉल असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस हॉक्स कॉल करणाऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सीएसएमटी स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धमकी दिल्यानं रेल्वे पोलिसांनी संपूर्ण स्थानकांवर शोध घेतला, मात्र काहीच सापडलं नाही.
जीआरपी नियंत्रण कक्षाला आला कॉल :शुक्रवारी रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) इथं आरडीएक्स ठेवण्यात आल्याचा कॉल आला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी सर्व स्थानकांचा शोध घेतला. मात्र स्थानकांवर काहीच आढळून आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर आरडीएक्स ठेवण्यात आल्याचा कॉल आल्यानं सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या. मात्र शोधाशोध घेतल्यानंतर हा हॉक्स कॉल असल्याचं स्पष्ट झालं.
बॉम्बशोधक पथकानं केली शोधाशोध :रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर आरडीएक्स ठेवण्यात आल्याचा कॉल आल्यानं सुरक्षा यंत्रणा अल्रट झाल्या. यावेळी रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला तत्काळ घटनेची माहिती दिली. यावेळी बॉम्बशोधक पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण सीएसएमटी रेल्वे स्थानक पालथं घातलं. सगळीकडं शोधाशोध घेऊनही काहीच संशयास्पद आढळून आलं नाही. त्यामुळे बॉम्बशोधक पथकानं याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवली.
हॉक्स कॉलरचा मुंबईसह बिहारमध्येही तपास :मुंबईतील सरकारी रेल्वे पोलिसांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्याबाबतची माहिती एका निवेदनातून दिली. यावेळी पोलिसांनी "मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आरडीएक्स ठेवल्याबद्दल जीआरपी नियंत्रण कक्षाला कॉल आला. फोन येताच रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती दिली. यावेळी सीएसएमटी स्थानकांवर शोध घेण्यात आला, परंतु काहीही सापडलं नाही. कॉल करणाऱ्या संशयीत आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. कॉलरचं लोकेशन ट्रेस करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी त्याचं लोकेशन सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दिसलं. मात्र थोड्या वेळानं त्यानं आपला मोबाईल फोन बंद केला. कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला नंबर मुंबई आणि बिहार या दोन्ही ठिकाणी ट्रेस करण्यात आला."
हेही वाचा :
- 'अंबानींच्या लग्नात बॉम्ब...' सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं उडाली खळबळ, मुंबई पोलीस सतर्क - Bomb Threat in Ambani Wedding
- मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी - Bomb Threats
- दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, अज्ञाताचा शोध सुरू - Mumbai Bomb Threat