महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडक्या बहिणीचे अर्ज दाखल करण्याला पुन्हा मुदतवाढ? 'हा' नवीन नियम नक्की वाचा - Mazi Ladki Bahin Yojana - MAZI LADKI BAHIN YOJANA

Mazi Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. तर योजनेतील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झालीय. मात्र, अनेक महिलांनी काही कारणामुळं अर्ज दाखल केले नव्हते. पण आता अर्ज (Application) स्वीकारणार आहेत का? असा प्रश्न महिलांना पडला आहे. वाचा याबद्दलची माहिती.

Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 4:08 PM IST

Updated : Oct 3, 2024, 4:23 PM IST

मुंबई Mazi Ladki Bahin Yojana: महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा सध्या राज्यात बोलबाला सुरू आहे. तीन हप्ते आल्यामुळं महिलांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. या योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट तारीख होती. परंतु महिलांचा वाढता प्रतिसादामुळं अर्ज दाखल करण्याची तारीख 31 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणामुळं अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज (Application) दाखल करण्यात येणार आहेत का? सरकारनं अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे.

मुदतवाढ मिळणार: या योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर 29 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते. ज्या महिलांचे आधार कार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रं नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु आता या महिलांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. पण नवीन अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ अजून मिळाली नाही. 30 सप्टेंबर अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. पण आगामी काळात याला मुदतवाढ मिळू शकते, असं बोललं जात आहे.

मुदतवाढीचा निर्णय लवकरच :एकीकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडं ज्या महिलांना याचा लाभ मिळाला नाही किंवा ज्यांनी अद्यापपर्यंत अर्ज दाखल केले नाहीत. त्यांना 30 सप्टेंबरनंतर अर्ज दाखल करता येणार आहेत का? असा प्रश्न महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारला असता, या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. आता नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. तसंच अंगणवाडीमध्ये देखील नवीन अर्ज घेतले जात नाहीत. पण याला आगामी काळात निश्चितच मुदतवाढ मिळू शकते, असं त्यांनी सांगितलं.

बैठकीतून घेणार निर्णय :या योजनेबाबत प्रत्येक आठ-दहा दिवसाला राज्य सरकारची बैठक असते. या बैठकीतून आम्ही निर्णय घेत असतो. सध्या नवीन अर्ज दाखल करण्याला ब्रेक दिला असला तरी, यापूर्वी जे कोट्यवधी अर्ज आले आहेत. त्यात ज्या काही त्रुटी आहेत. कागदपत्रं अपुरी आहेत. त्या अर्जांची छाननी करण्याचं काम अजूनही युद्धपातीवर सुरू आहे. पण 30 सप्टेंबरनंतर महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत किंवा नवीन अर्ज दाखलच करूच शकणार नाहीत, असं म्हणता येणार नाही. कारण याबाबत आम्ही आता जरी ब्रेक घेतला असला तरी दहा दिवसानंतर किती दिवसांची मुदतवाढ द्यायची? किंवा या योजनेचा अर्ज दाखल करायला मुदतवाढ मिळणार आहे का? याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.



हेही वाचा -

  1. बापरे! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार? नेमकं प्रकरण काय? - Ladki Bahin Yojana Maharashtra
  2. आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 'लाडकी बहीण योजने'चे पैसे 'या' तारखेला मिळणार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
  3. लाडकी बहीण योजनेत १ कोटी ९६ लाख महिलांना मिळाला तिसरा हप्ता, इतर लाभार्थ्यांना कधी ? - Ladki bahin yojana
Last Updated : Oct 3, 2024, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details