महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Amol Kolhe : "ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते त्यांना दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आलीय", अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला - Hadapsar Assembly Constituency

MP Amol Kolhe : हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज (11 मार्च) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे रणशिंग फुंकले.

MP Amol Kolhe
डॉ. अमोल कोल्हे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 10:47 PM IST

डॉ. अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीविषयी सांगताना

पुणेMP Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला दिसत नाहीये. भाजपा राज्यात 35 लोकसभेच्या जागा लढवणार असून राष्ट्रवादी 3 तर शिवसेनेला 8 जागा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्व काही होतं जे देणारे होते त्यांना आज दिल्लीच्या दरबारात मागण्याची वेळ आली आहे.

मविआतील घटकपक्षांचा निर्णय :आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकमुखानं डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असून चांगल्या मताधिक्यानं त्यांना निवडून आणणार, असा विश्वास या बैठकीत सर्वपक्षीयांनी व्यक्त केला. यावेळी कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं विकास पर्व प्रकाशित करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते.

पक्ष आहे पण उमेदवार नाही :अमोल कोल्हे म्हणाले की, "शिरूर लोकसभा प्रचार दौरा सुरू आहे. मला शरद पवार यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. शिरूर मतदार संघात अनेक विकास कामे सुरू आहेत. अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेक कामेही प्रलंबित आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत झुकू देणार नाही. आज ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ते खूपच अवघड आहे. राज्यात काही पक्षांकडे उमेदवार नाही तर काहीकडे पक्ष नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे."

नाना पाटेकरविषयी काय म्हणाले अमोल कोल्हे ?निलेश लंके यांच्या बाबतीत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, निलेश लंके यांना लोकांच्या मनातील ओळखायला वेळ लागणार नाही. त्या चर्चेबाबत मला काहीही माहीत नाही. वेट आणि वॉच आहे. आज अस्वस्थ असणारे अनेक जण आहेत. त्यामुळे पवार आणि लंके याच्या भेटीत काय घडलं मला नाही माहिती. नाना पाटेकर यांच्या उमेदवारीबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, नाना पाटेकर मोठे अभिनेते आहेत. मग अजित पवार यांनी मांडवगण फराटा येथे विधान केलं होतं, त्याच काय झालं? असा प्रश्न निर्माण होतो.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल
  2. महायुतीची जागा वाटपाची दिल्लीतील बैठक रद्द; एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं
  3. Devendra Fadnavis : मुंबई कोस्टल रोडमध्ये कोणी घातले खोडे? कोणी केली वसुली? कोण घेतय श्रेय? फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details