महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तू मला आवडतेस...'; स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला इंस्टा मेसेज, मनसैनिकांनी फुल्ल धुतला - School Van Driver Message Girl - SCHOOL VAN DRIVER MESSAGE GIRL

School Van Driver Message Girl : बदलापूर अत्याचार घटनेनंतर अशा प्रकारच्या अनेक घटना आता राज्यभरातून समोर येत आहेत. मागील तीन दिवसात जवळपास 11 लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळं पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना पुण्यात उघडकीस आली.

School Van Driver Message Girl Pune
स्कूल व्हॅन चालकाला मनसेनं दिला चोप (Source : MNS Video)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 12:32 PM IST

Updated : Aug 23, 2024, 12:47 PM IST

पुणे School Van Driver Message Girl : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजन घटना समोर येत आहेत. आधी बदलापूर त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहरात अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकानं मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला जाब विचारत त्याला चोप दिला.

व्हॅन चालकावर गुन्हा दाखल : याबाबत स्कूल व्हॅन चालकावर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटना उघडकीस येताच स्कूल व्हॅन चालकाला मनसे कार्यकर्ते गणेश भोकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी चांगलात चोप दिला. त्यानंतर त्या स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पालक संतप्त : काही दिवसांपूर्वी शाळेतील स्कूल व्हॅन चालकानं विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असा मेसेज केला होता. हा स्कूल व्हॅन चालक प्रत्यक्ष तसंच इंस्टाग्रामवर मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता, असा आरोप पालकांचा आहे. ही घटना समोर आल्यावर पालकांनी संताप व्यक्त केला. "आम्ही तुमच्या विश्वासावर मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्य करत असाल तर विश्वास कोणावर ठेवायचा?" असा संतप्त सवाल पालकांनी विचारला.

विश्वास ठेवायचा की नाही? -पालक : विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. ड्रग्ज प्रकरण, महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळं पुणे शहर चर्चेत आहे. पालक हे शाळा प्रशासनावर विश्वास ठेवत आपल्या मुलींना शाळेत पाठवतात. मात्र, वरील प्रकारानंतर पालक संतप्त झाले असून, विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न पालकांना पडलाय.

हेही वाचा -

  1. शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज; अन् गुन्हा दाखल झाला मुख्याध्यापकावर - Teacher Obscene Messages To Girl
  2. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
  3. भय इथलं संपलं नाही! मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत - Girl Sexually Abuse Kandivali
Last Updated : Aug 23, 2024, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details