महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंसत मोरे सोशल मीडियाच्या आहारी, ठाकरे पुत्रानं घेतला मोरेंचा समाचार - Lok Sabha Elections 2024 - LOK SABHA ELECTIONS 2024

Amit Thackeray criticizes Vansant More : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीनंही प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला असून प्रचारातही सहभागी होणार आहे. मुंबईत राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

Amit Thackeray
अमित ठाकरे वसंत मोरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 8:54 PM IST

पुणेAmit Thackeray criticizes Vansant More :मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं पुण्यात महायुतीची ताकद वाढली आहे. पुणे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज अमित ठाकरे यांची भेट घेतली. यासोबतच अमित ठाकरे तसंच मुरलीधर मोहोळ यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईत उद्धव ठाकरे गटाला फटका :अमित ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माहिती दिली. अमित ठाकरे यांनी मुंबई लोकसभेसंदर्भात देखील भाष्य केलंय. 'मुंबईतील वातावरण उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात आहे. खिचडी घोटाळ्यामुळं अमोल कीर्तिकर वादात सापडले आहेत. त्यामुळं मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिकाही मांडली. आपल्या ठाकरे शैलीत अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडणारे मनसेचे पुणे शहर नेते वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केला.

वंसत मोरेंवर अमित ठाकरेंची टीका :वंसत मोरे यांना सोशल मीडियाचं व्यसन लागलाय. त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत असले, तरी त्यांनी मनसेच्या पाठिंब्याची अपेक्षा न ठेवता राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करावं. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावं, असे अमित ठाकरे म्हणाले. वसंत मोरे यांनी मनसे सोडून पुणे शहर लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडीकडून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोरे यांना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे. मोरे हे मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, शहर पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळं आपलं नाव पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडं पाठवलं नसल्याचा आरोप करत वसंत मोरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा :मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं मनसे कार्यकर्त्यांना कडक इशारा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात काम केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवाराची शिवाजी पार्कवर स्वतः राज ठाकरे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंतिम सभा होण्याची शक्यता अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024
  2. मोदींची हवा, कुठे नरम, कुठे गरम; विरोधकांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया तर महायुतीला दिसतोय मोदींचा करिश्मा - Lok Sabha Election 2024
  3. काय आहे नागपूर मतदार संघाचं गणित?, कोणाच्या गळ्यात पडणार विजयी माळ - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details