महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

ETV Bharat / state

नियम धुडकावणाऱ्या 9 सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई - Mira Bhayandar Crime News

Mira Bhayandar Crime News : मीरा-भाईंदर शहरात महापालिका आरोग्य विभागाकडून (Mira Bhayandar Health Department) सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या 9 सोनोग्राफी केंद्रांचं (Sonography Centers) नोंदणी प्रमाणप्रत्र निलंबित केलं आहे.

Sonography Center
सोनोग्राफी केंद्र (File Photo)

मिरा भाईंदर Mira Bhayandar Crime News:मिरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागानं (Mira Bhayandar Health Department) धडक कारवाई केली आहे. रुग्णांचा आवश्यक तपशील न ठेवल्यानं, तसंच कायद्याचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत शहरातील नऊ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी निलंबित केली आहे. यात बड्या रुग्णालयांसह सोनोग्राफी केंद्रांचा (Sonography Centers) देखील समावेश आहे. मिरा-भाईंदर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयाचाही यात समावेश आहे.


२० दिवसशहरात विशेष मोहीम :मिरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून जानेवारी महिन्यात सोनोग्राफी केंद्रांच्या अचानक तपासणीसाठी २० दिवस शहरात विशेष मोहीम शासन आदेशानुसार राबवण्यात आली होती. सोनोग्राफी केंद्रांना रुग्णांची आवश्यक माहिती, रुग्णांचा अहवाल आणि इतर गोष्टींचा तपशील आदी गोष्टींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. ह्याच अटीवर त्यांना परवानगी दिली जाते.

९ सोनोग्राफी केंद्रांवर केली कारवाई : मात्र, त्यानंतरही आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याकडं ४ रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात आणि ५ सोनोग्राफी केंद्रांनी पाठ फिरवल्याचं विशेष पथकाच्या निदर्शनास आलं होतं. हे पीसीपीएनडीटी आणि वैद्यकीय गर्भपात कायद्याचं उल्लंघन असल्यानं, संबंधित रुग्णालयांना नोटीसा बजावत खुलासा मागवण्यात आला होता. यावर त्यांच्याकडून अपेक्षित असं उत्तर मिळालं नाही त्यामुळे ९ सोनोग्राफी केंद्रांवर अखेर मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

एक महिन्यासाठी प्रमाणपत्र केलं निलंबित: मनपाकडून तीन केंद्रांचं एक महिन्यासाठी तर सहा केंद्रांचं आठवडाभरासाठी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईमुळं शहरातील खासगी आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ माजली असून त्याचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा -

  1. मेळघाटातील धक्कादायक प्रकार; सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला 6 तास ठेवले ताटकळत
  2. विशेष : गर्भलिंग तपासणी आणि स्त्रीभ्रूण हत्येबाबत सांगलीत दिसतोय सकारात्मक बदल
  3. Feticide Case : ६ वया खालील लिंग गुणोत्तरात पुरोगामी महाराष्ट्र देशात २७ व्या स्थानावर, स्त्रीभ्रुण हत्येची ६१२ प्रकरणे दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details