शिर्डी Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : "काँग्रेस सोबत जाणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून दूर जाणं हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं. टोमणेबॉम्ब नको, लोकांना विकास हवा असतो," असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे राजकारणावर जास्त बोलत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितावर बोलणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांचा मी खूप मान ठेवतो. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडं मागील कालावधीत दुर्लक्ष केलं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ते आज शिर्डी इथं साई बाबा परिक्रमा सोहळ्यात बोलत होते.
टोमणेबॉम्ब नको, लोकांना विकास हवा असतो :"जगभरात सर्वे घेतल्यानंतर सर्वात जास्त लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाला दिशा देऊन जनतेसाठी काम केलं. लोकांना टोमणेबॉम्ब नको, विकास हवा असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करणं गरजेचं आहे," असंही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.