महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री असावे तर असे...! नक्षलग्रस्त गडचिरोलीत उद्योग येण्यासाठी पालकमंत्र्यांनी केली 250 एकर शेती दान - Gadchiroli News - GADCHIROLI NEWS

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक असलेली ओळख पुसली जाणार असून गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून नवीन ओळख प्राप्त होणार आहे.

Gadchiroli News
पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 9:42 PM IST

नागपूर Gadchiroli News : लवकरच गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक असलेली ओळख पुसली जाणार असून गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून नवीन ओळख प्राप्त होणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात 5 हजार कोटी रुपये खर्चून स्टील प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. येत्या 17 जुलै रोजी या स्टील प्लांटच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम (ETV Bharat Reporter)

आत्राम यांच्याकडून 250 एकर शेती दान : अहेरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा, नक्षलग्रस्त भागात उद्योग यावे म्हणून 250 एकर शेती दान केल्याची माहिती आत्राम यांनी दिली आहे. "माझं येवढ्या वर्षांचं स्वप्न साकार होत आहे. गडचीरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात औद्योगिक वाटचालीला गती देण्यासाठी इस्पात स्टील प्लांट एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आणि उद्योगमंत्री उदय यामंत यांच्या हस्ते 17 जुलैला सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाचं भुमिपुजन होणार आहे."

गडचिरोली स्टिल उत्पादनाचं हब होणार : प्रकल्पाच्या पायाभरणीनं एक स्टिल उत्पादनाचं हब म्हणून गडचीरोलीची ओळख निर्माण होणार आहे. सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील हा पाच हजार कोटींचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. आदिवासी भागातील गोर गरिब तरुणांना स्टील प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. स्टील प्लांटची निर्मिती एकूण 350 एकर क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी 250 एकर शेती धर्मरावबाबा आत्राम यांनी दान केली आहे. त्यामुळं नक्षलग्रस्त भागात रोजगाराला चालना देण्यासाठी व गडचीरोलीच्या औद्योगिक विकासासाठी सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

  1. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश - Naxalite Encounter Gadchiroli
  2. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या
  3. Gadchiroli News: वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण; गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे बारमाही रस्त्याने जोडणार- उपमुख्यमंत्री फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details