महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी मौलाना अजहरीला मुंबईतून अटक; पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळं जमावावर गुन्हा दाखल - Maulana Mufti Salman Azhari

Maulana Mufti Salman Azhari Arrested : गुजरात पोलिसांनी रविवारी उशीरा मुंबईत मोठी कारवाई केली. मुस्लीम धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना घाटकोपरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुजरातमधील जुनागढमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

Maulana Mufti Salman Azri arrested
मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 11:01 PM IST

Updated : Feb 5, 2024, 12:32 PM IST

मुफ्ती सलमान अजहरी यांचे वकील वाहिद शेख

मुंबई Maulana Mufti Salman Azhari Arrested : द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना रविवारी (4 फेब्रुवारी) रात्री मुंबईतून अटक केली. न्यायालयाकडून त्यांना गुजरातला घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरातला घेऊन जाण्याची मागणी केली होती. न्यायालयानं त्यांना ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आणि त्यांना जुनागढला नेण्याची परवानगी दिली.

जमावाविरोधात गुन्हा दाखल :मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 353, 332, 333, 341, 336 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांसह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

समर्थकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी : गुजरात पोलिसांनी मुफ्ती यांना अटक केल्यानंतर त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी शेकडो समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. मुंबई पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थितीचं गांभीर्य पाहता परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आक्षेपार्ह विधान केल्यामुळे कारवाई : 31 जानेवारीच्या रात्री गुजरातमधील जुनागढ येथे आयोजित एका कार्यक्रमात इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अजहरी यांनी काही आक्षेपार्ह विधानं केली होती. मुफ्तींचे हे वक्तव्यं प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. मौलाना मुफ्ती, कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता.

प्रक्षोभक भाषण केलं नसल्याचा दावा : अझहरी यांच्या अटकेनंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी दावा केला की, त्यांनी कोणतंही प्रक्षोभक भाषण केलं नाही आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. "कायद्याच्या योग्य प्रक्रियेचं पालन केलं पाहिजे. त्यांना कलम 41 अ अंतर्गत नोटीस दिली पाहिजे. आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कोणतंही प्रक्षोभक भाषण दिलं नाही. त्यांनी सर्व स्पष्टीकरण दिलं. जेव्हा वास्तविक द्वेषपूर्ण भाषणं दिली जातात, तेव्हा सरकार कोणतीही कारवाई का करत नाही? तेव्हा अटक का केली जात नाही?", असा सवाल वारिस पठाण यांनी उपस्थित केला.

धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत : मुफ्ती सलमान अजहरी यांचे वकील वाहिद शेख यांनी मीडियाला सांगितलं की, "अजहरी यांच्या निवासस्थानी सुमारे 35-40 पोलिस जमले होते. मुफ्ती यांनी पोलिसांना सहकार्य केलं. त्यांच्या विरोधात कलम 153 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलंय." अटकेच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना ते म्हणाले की, "त्यांनी दिलेल्या भाषणात कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत. कोणतंही चिथावणीखोर वक्तव्य दिलेलं नाही. विश्व हिंदू परिषद आणि संघानं पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. त्यानंतर स्व. मोटो एफआयआर नोंदवला गेला."

शनिवारी दोघांना अटक :चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जुनागढ पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या प्रकरणी मलिकसह हबीब यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. अजहरी यांनी धर्माविषयी आणि अमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल जनजागृती करणार असल्याचं सांगून कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती.

हे वाचलंत का :

  1. परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्याला यूपी एटीएसनं केली अटक; आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप
Last Updated : Feb 5, 2024, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details