महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोखंडवाला परिसरात इमारतीला भीषण आग, आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू

अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्स परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 3 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Updated : 4 hours ago

Massive Fire Breaks Out In Mumbai
रिया पॅलेस या इमारतीला लागलेली भीषण आग (Reporter)

मुंबई :एका 14 मजली इमारतीला लागलेल्या आगीत होरपळून 3 नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मायानगरी मुंबईतील अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्स परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीत आज सकाळी घडली. चंद्रप्रकाश सोनी, कांता सोनी आणि पेलूबेटा असं मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागल्यानं या आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोखंडवाला परिसरातील इमारतीला आग :मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात रिया पॅलेस ही 14 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी आठ वाजता आग लागली. दहाव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. या आगीत घरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा आणि एका कर्मचाऱ्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. चंद्रप्रकाश सोनी (वय वर्ष 74), कांता सोनी (वय वर्ष 74) आणि पेलूबेटा (वय वर्ष 42) असं मृत्यूमखी पडलेल्या तिघांचा नावं आहेत. यातील चंद्रप्रकाश सोनी आणि कांता सोनी हे ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पेलूबेटा हा त्यांचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती असल्याचंही सूत्रांनी यावेळी सांगितलं.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश :या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या तिघांना सुरुवातीला कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इमारतीला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. चेंबूरमध्ये आगीची दुर्घटना, एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Mumbai fire news
  2. मुंबईच्या लोअर परळ परिसरातील आठ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल - Mumbai Building Fire
  3. मुंबईत अग्नितांडव! ताडदेव परिसरातील गोदामाला भीषण आग - Mumbai Fire
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details