महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाच्या श्रेयासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले; छगन भुजबळांची टीका

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. मराठा आरक्षणाचं श्रेय लाटण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसल्याची टीका छगन भुजबळांनी केलीय.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange
Chhagan Bhujbal on Manoj Jarange

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 6:53 AM IST

मुंबई Chhagan Bhujbal on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करत सरकारनं नवीन अधिसूचना काढली. मात्र, नवीन अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळं गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. यामुळं त्यांची तब्बेत खालावली आहे. श्रेय लाटण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, त्यांचा तो समज काही चुकीचा नसल्याची टीका ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.

विशेष अधिवेशनाचं आयोजन : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरुच आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून 20 फेब्रुवारीला एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. मराठा समाजाला ओबीसीमधून नाही तर वेगळं आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. मनोज जरांगे पाटील यांना आता उपोषण करण्याची गरज का पडली? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केलाय.

श्रेयासाठी जरांगे उपोषण करताय : मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, "सगळ्यांना विश्वास होता की मराठा आरक्षण 15 फेब्रुवारीला मिळून जाईल. तसंच जरांगे यांना देखील तेच वाटले असेल म्हणूंन ते उपोषणाला बसले असतील. आरक्षणाचं श्रेय आपल्याला मिळेल असा त्यांचा समज असून तो काही चुकीचा नाही. 10 तारखेला उपोषण आणि 15 ला आरक्षण जाहीर होईल म्हणजे दोन वेळा गुलाल उधळता येईल. परंतु, तसं न होता चार ते पाच दिवस निर्णय पुढे गेलाय. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झालाय. यातून ते मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मला शिव्या देत आहेत. तसंच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरत असल्याचं माध्यमांनी दाखवलंय. असा त्रागा करण्यापेक्षा शांत बसावं, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा कायदा आम्ही पास करत आहोत. कोणाला शिव्या देऊन आणि आणखी भानगडी करुन काही फायदा नाही."

मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या : कुणबीत जे बॅकडोअरनं घुसवले त्याविरोधात बाहेर आणि न्यायालयात आमचा लढा सुरु राहणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. बॅकडोअरमधून कुणबीत त्यांना घुसवू नका किंवा ती सगेसोयरेची व्याप्ती वाढवू नका. यासाठी आमची लढाई सुरू असल्याचं भुजबळ म्हणाले. क्युरेटिव्ह पिटीशनसाठी तीन न्यायमूर्ती आणि शुक्रे आयोग बसले आहेत. मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिले जाईल, सर्वोच्च न्यायालयात ते कसं टिकेल? याला आमचा पाठिंबा आहेच. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, आमच्यातून नको अशी आमची भूमिका आहे. विशेष अधिवेशनात देखील कोणीही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याला विरोध करणार नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी मान्यच होणार नाही कारण की ती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :

  1. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकारला चिंता, वैद्यकीय तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
  2. जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस; मराठा समाजाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी राजी

ABOUT THE AUTHOR

...view details