महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण सोडून सर्व रद्द करा - मनोज जरांगे पाटील - Maratha Reservation - MARATHA RESERVATION

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा-कुणबी एकच असल्याचा दावा केलाय. मराठा-कुणबीबाबत आम्ही सरकारला सर्व नोंदी दिल्या आहेत. सरकारला आरक्षण देता येत नसेल तर, 1994 मध्ये दिलेलं सर्व आरक्षण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील फाईल फोटो (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 4:38 PM IST

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation:वाशीतील गुलालाचा अवमान करू नका, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीत गुलाल तुमच्यावर रुसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. मी प्रामाणिकपणे लढत आहे. शेती करणारा प्रत्येक कुणबी आहे. मुस्लिम समाजाला देखील ओबीसीमध्ये सामाविष्ट करावं, अशी मागणी त्यांनी केलीय. 13 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा 1994 नंतर दिलेलं आरक्षण रद्द केलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 1994 नंतर दिलेलं आरक्षण कोणत्या आधारे दिलं होतं, ते आम्हाला कळलं पाहिजे. अन्यथा बाबासाहेबांनी दिलेलं मूळ आरक्षण कायम ठेवून बाकीचं आरक्षण रद्द करा, अशी त्यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली.

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

आमच्या मागण्या कायद्यानुसार :आम्ही केलेल्या मागण्या बेकायदेशीर मुळीच नाही. सरकारी नोंदी आमच्या आहेत. 1967 मध्ये 180 जाती, 350 पोट जाती या आरक्षणात आल्या आहेत. कुणबी म्हणून आम्ही त्यात आरक्षण मागत आहोत. 1967 च्या कायद्यानुसार 83 क्रमांकावर मराठा कुणबी असा उल्लेख आहे. आम्ही आमचे सर्व पुरावे दिलेले आहेत. आता आम्हाला काही दाखवायची इच्छा उरलेली नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सगे-सोयरेबाबत सरकार सकारात्मक आहे, मात्र निवडणूक होईपर्यंतच. एकदा निवडणूक झाली की, पुन्हा त्याचं काही हो, अशी भूमिका आहे. मुळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितलं, की आम्ही आरक्षण दिलं होतं, मात्र ते टिकलं कुठं. आता जुनं सगळं सोडून द्या. आता आम्हाला टिकणार आरक्षण द्या. भविष्यात आम्हाला आमच्यासाठी कोणी काही केलं, हे सांगण्यासारखं काहीच नाही. त्यामुळं आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा. आम्हाला निवडणुकीत उतरण्याची इच्छा नाही, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

13 जुलैनंतर निर्णय घेऊ :मराठा समाजाचा शेती व्यवसाय आहे. विदर्भात शेती करणारा कुणबी आहे, तर मराठवाड्यात वेगळा कसा होऊ शकतो. त्यामुळं सगे-सोयरेबाबत निर्णय घेतला पाहिजे. आमची मागणी चुकीची नाही. त्यामुळं विवाहात जुळलेल्या संबंध देखील त्यात आली पाहिजे. आमच्यात आंतरजातीय विवाह मुळीच नाहीत. मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता द्या, विनाकारण आम्हाला धोका देऊ नका. आचारसंहितेचं कारण देऊन आम्हाला पुन्हा धोका देऊ नका. अन्यथा आम्हाला निवडणुकीत उतरावा लागेल. 13 जुलैनंतर आम्ही बैठक घेऊ. या बैठकीत 288 जागांवर निवडणुकीबाबत निर्णय घेऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

मी प्रामाणिक :मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीसाठी मी प्रामाणिकपणे लढत आहे. काम करणाऱ्यांना दोषी ठरवू नका, आमचे पाठीराखे व्हा. दोष द्यायचा, असेल तर सरकारला द्या, मी बेगडी नाही. त्यामुळं माझ्याबाबत अनावश्यक टीका करू नका. ज्यांनी चाळीस वर्ष फसवलं, त्यांना बोला, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी बदललेलो नाही, ज्या मागण्या आधी होत्या, त्याच आजही कायम आहेत. वाशीमध्ये घेतलेले निर्णय मी एकट्यानं घेतले नाहीत. तज्ञ मंडळी, वकील यांना सोबत घेऊनच मी पुढचे निर्णय घेतले. त्यामुळं आता सरकारनं वाशीमधील गुलालाचा अपमान करू नये, अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीय.

हे वाचलंत का :

  1. अमरावतीत कार्यालयावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष : खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Amravati MP Office Dispute
  2. ...म्हणून आम्हाला अपेक्षा नाही; लोकसभा उपसभापतीबाबत शरद पवार काय म्हणाले? - Sharad Pawar
  3. नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन, लातूरमधून दोन शिक्षकांना एटीएसनं घेतलं ताब्यात - NEET Paper Leak Case

ABOUT THE AUTHOR

...view details