महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 11:02 AM IST

ETV Bharat / state

बसच्या चाकाखाली दुचाकी घासत गेल्यानं उडाल्या ठिणग्या, एसटीनं घेतला पेट, दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू - Pune Bangalore Highway Accident

Pune Bangalore Highway Accident : सातारा बंगळुरू महामार्गावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी बसखाली घासत गेल्यानं ठिणग्या उडाल्या. त्यामुळे बसला लागलेल्या आगीत एस टी जळून खाक झाली. या आगीत दुचाकीस्वार ठार झाला.

Pune Bangalore Highway Accident
जळालेली बस (Reporter)

सातारा Pune Bangalore Highway Accident :पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पेट घेतल्यानं एसटी जळून खाक झाली असून एसटीखाली अडकलेल्या दुचाकीस्वाराचाही होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरलं. अपघातात लागलेल्या आगीमुळे दुचाकीस्वार होरपळून ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली.

जळालेली बस (Reporter)

दुचाकी घासत गेल्यामुळे उडाल्या ठिणग्या :घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून पलूसकडं निघालेल्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. धावत्या एसटीबरोबर दुचाकी बरंच अंतर महामार्गावर घासत गेली. घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या आणि एसटीनं पेट घेतला. भुईंज (ता. वाई) हद्दीत ही घटना घडली. एसटीनं पेट घेतल्यानंतर महामार्गावर आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरले.

जळालेली बस (Reporter)

खिडकीतून उड्या मारुन प्रवाशांनी वाचवला जीव :प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटीला आग लागल्याची जाणीव होताच चालक, वाहकानं प्रवाशांना तातडीनं खाली उतरवलं. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. या घाईगडबडीत अनेक प्रवाशांचं साहित्य एसटीत राहिल. तर काहीचं साहित्य आगीत जळून खाक झालं. एसटीला आग लागल्याची माहिती मिळताच वाई नगरपरिषद आणि भुईंज कारखान्याचे पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली.

पोलीस भरतीला गेलेल्या तरुणीची कागदपत्रं जळाली :पोलीस भरतीला गेलेली एक तरुणी त्या एसटीत होती. पुण्याहून ती कराडला निघाली होती. एसटीला आग लागल्यानंतर खाली उतरण्याच्या घाईगडबडीत तिची बॅग एसटीतच राहिली. बॅगमध्ये तीची मूळ शैक्षणिक कागदपत्रं होती. मात्र ती कागदपत्रं जळून खाक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. Palghar News: धूम स्टाईल बाईक रायडिंगमुळे वाढले अपघाताचे प्रमाण; वाहतूक नियमांचे वाजले तीनतेरा
  2. Thane Accident : ठाणे जिल्ह्यात अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; तरुणीला टेम्पोने तर पोलिसाला ट्रकने उडविले
  3. कुठे पोलीस तर कुठे पती-पत्नी; राज्यात दोन दिवसांत तीन 'हिट अँड रन'च्या घटना, चार जणांचा बळी - Hit and Run Accident

ABOUT THE AUTHOR

...view details