महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात पतंगबाजीच्या नादात दोघांनी गमावला जीव, नायलॉन मांजांमुळे 17 जखमी - MAKAR SANKRANTI 2025

कापलेली पतंग पकडण्यासाठी पळत असलेल्या एकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय. तर एकाचा गच्चीवरून खाली पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना मकर संक्रातीच्या दिवशी घडली आहे.

Makar Sankranti 2025
मकर संक्रांती नागपूर (Source- ETV Bharat Marathi)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 9:53 AM IST

Updated : Jan 15, 2025, 10:46 AM IST

नागपूर - राज्यभरात मकर संक्रांतीचा सण ( Makar Sankranti 2025) उत्साहात जरी साजरा करण्यात आला असला तरी अनेकांच्या जीवावर हा सण बेतला आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांज्यामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला असताना नागपुरमध्ये दोघांचा मृत्यू झालाय.

नागपुरात पतंगबाजी दोघांच्या प्राणांवर बेतली, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. १७ जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार करण्यात आले. तर १० जखमींवर (मेयो) इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. काही जण पतंगाचा पाठलाग करून जखमी झाले आहेत. तर काहींच्या बोट, नाक, कान हे नायलॉन मांजामुळे जखमी झाले आहेत. तर तीन मुलांचे नायलॉन मांजामुळे बोट कापले गेले.



दोघांचा मृत्यू-हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दी राहणार रितेश गंधश्रीवार या तरुणानं मित्रांसोबत पतंगबाजी केली. त्यानंतर काही वेळ पतंग पकडण्यासाठी सैरावैरा पळाला. मित्रांसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागल्यानं त्याला मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रितेशचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं बोललं जात आहे.

गच्चीवरून पडून तरुणाचा मृत्यू- पंतग उडवताना मृत्यूची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पतंग उडवताना अचानक तोल जाऊन एक तरुण पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यात गंभीर जखमी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोहेल खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोहेल खान हा पाचव्या मजल्यावर पतंग उडवत होता. पतंग उडवताना तो इतका बेभान झाला होता की, गच्चीवर सुरक्षा भिंत नाही, याचंदेखील भान उरलं नाही. पतंग उडवण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन गच्चीवरून खाली पडला. त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मुंबईत नायलॉन मांजा वापरण्यावर कारवाई-मकर संक्रांतीपूर्वी मुंबई पोलिसांनी चार दिवस विशेष मोहिम राबवून बंदी घातलेला नायलॉन माजा आणि इतर साहित्य जप्त केलं. विविध कलमांखाली एकूण १९ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाईदरम्यान ३५,३५० रुपयांचा नायलॉन मांजा आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले. नायलॉन मांजामुळे जीव धोक्यात असल्यानं कायदेशीर बंदी लागू करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

  1. नागपूरकरांनो सावधान! नायलॉन मांज्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढवा 'ही' शक्कल
  2. दोन दिवसापूर्वी ठरलं लग्न, आज नायलॉन मांजामुळे चिरला गळा; तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानं कुटुंबावर 'संक्रांत'
Last Updated : Jan 15, 2025, 10:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details