महाराष्ट्र

maharashtra

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची 'मुसळधार', नवजामध्ये 24 तासात 235 मिलीमीटर पावसाची नोंद - Heavy of rain in Koyna Dam

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 12:02 PM IST

Updated : Jul 3, 2024, 12:23 PM IST

Koyna Rain : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणाचा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगरमध्ये 133 मिलीमीटर आणि नवजामध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Heavy Rain
मुसळधार पाऊस (Etv Bharat)

सातारा -KoynaRain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. पश्चिमेकडील पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. पश्चिमेकडे पावसाचा जोर असला तरी पुर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 21 हजार क्युसेक इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगरमध्ये 133 मिलीमीटर आणि नवजामध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी पूर येत असल्याचं दिसत आहे. पावसामुळे काही भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवजामध्ये आज 1236 मिलीमीटर पाऊस : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील नवजा इथं आजअखेर सर्वाधिक 1236 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्या खालोखाल कोयनानगरमध्ये 1078 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 1022 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळं कोयना धरणातील पाणीसाठा 23 टीएमसीवर पोहोचला आहे. असताच पाऊस येत राहिला तर याठिकाणी पूर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

चोवीस तासात 6 हजार क्युसेकने आवक वाढली :पश्चिम भागात पावसामुळे कोयना धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणात प्रतिसेकंद 15 हजार 650 क्युसेस इतकी आवक होती. त्यानंतर पाण्याची आवक तब्बल 6 हजार क्युसेकनं वाढून 21 हजार 58 क्युसेक इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 133 मिलीमीटर, नवजा येथे 102 तर महाबळेश्वरमध्ये 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागात खूप जास्त पाऊस पडत असल्यानं अनेक लोकांना अडचणीचा सामना करवा लागत आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, ओढ्यांना पूर : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयनासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. संततधार पावसामुळे घाटमार्गावर दरडीदेखील कोसळत आहेत. त्यामुळे आता याठिकाणची परिस्थित बिकट असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

  1. दिवे घाटातील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य, पहा ड्रोन व्हिडिओ - Ashadhi Ekadashi 2024
  2. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : दुधाला मिळणार 35 रुपयांचा भाव, विखे पाटीलांची विधानसभेत घोषणा - milk price Increase
  3. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला, ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून - Satara News
Last Updated : Jul 3, 2024, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details