मुंबई - महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नगरविकास तर अजित पवारांकडे अर्थ खातं आलं आहे.
हिवाळी अधिवेशनाचं शनिवारी सूप आज वाजलं. खातेवाटप लवकरच होणार आहे, आज रात्री किंवा उद्या सकाळी खाते वाटप झालेलं तुम्हाला दिसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं.