नाशिक :उपमुख्यमंत्री अजित पवार वेषांतर करून दिल्लीत गेल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे तसंच संजय राऊत यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. "मी वेषांतर कुठेही गेलो नाहीय. त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. आरोप सिद्ध झाला, तर मी राजकारण सोडेन," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
भुजबळांची अनुपस्थिती :अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री नाशिकच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ नेत्यांसोबत कायम असतात. मात्र, ते आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळं विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळं छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे.
गैरसमज निर्माण करण्याचं काम :उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले"माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरू आहे. आरोप करण्यापूर्वी माहिती घ्यावी. मी 35 वर्षे विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री मंत्री, आमदार होतो. मला जबाबदारीचीही जाणीव आहे. बदललेल्या नावानं प्रवास करणं हा गुन्हा आहे. सर्वत्र सीसीटीव्ही आहेत. त्यामुळं बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यात तथ्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केलं.
माझी प्रकृती ठीक नव्हती :त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, " मी 15 दिवस मतदारसंघात नव्हतो. मला आता माझ्या मतदारसंघात जायचं आहे. तसंच अजित पवार हे 10 ऑगस्टला पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार असताना ते माझ्या मतदारसंघात येणार आहेत. मग मी त्यांच्यासोबत असेन. सध्या सर्वांचं लक्ष आपआपल्या मतदारसंघावर आहे. एकाच वेळी सर्व नेत्यांना एकाच ठिकाणी जाणं शक्य होणार नाही. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नव्हती."
'हे' वाचलंत का :
- का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
- विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics
- "दोन नेत्यांची चाकरी करणाऱ्या संजय राऊतांना..." परिणय फुकेंनी विरोधकांवर साधला निशाणा - Parinay Phuke On Sanjay Raut