नवी दिल्ली- " शिवसेनेला भाजपानं गृहमंत्रीपद, पंतप्रधानपद कबुल केले असेल. पण भाजपाचाच मुख्यमंत्रिपद होणार आहे, असा टोला शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
महायुतीला विधानसभेत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये तिढा निर्माण झाला. त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले, " 26 तारखेची मुदत उलटून गेली आहे. त्यांचे (महायुती घटक पक्ष ) तंगड्यात तंगडे अडकले. दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत. भाजपा शब्द आणि नैतिकता पाळत नाहीत. 'गरज सरो आणि वैद्य मरो', अशी भाजपाची भूमिका आहे. शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहिणी योजनेसाठी वाट पाहत आहेत. "
पाशवी बहुमत मिळाले तर हे देशासाठी हानीकारक आहे. गौतम अदानी यांच्यावर बोलताना विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो. अदानींसारखे भूत तयार होतात. देशात हुकुमशाही वाढते-शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार, संजय राऊत
माजी सरन्यायाधीश यांच्या टीकेवर प्रतिक्रिया -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी तत्कालीन सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं वक्तव्यं केलं. चंद्रचुड यांनी निकाल वेळेवर न दिल्यानं नाराजी व्यक्त केली. त्यावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कोणती सुनावणी घ्यायची हा सरन्यायाधीशांचा हक्क आहे, असे म्हटले. सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रोल बाँडसारख्या महत्त्वाच्या प्रकरणावंर सुनावणी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.यावर खासदार राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, " माजीसरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड हे विद्वान आणि कायदेपंडित आहेत. जो असेल तोच निकाल द्या, असे आमचं म्हणणे होते. त्यात चुकीचं काय आहे? कोणते प्रकरण निकाली लावायचं हा सरन्यायाधीशांचा हक्क आहे. न्यायालय हे सरकारची भूमिका करतात का? ते पक्षांतरासाठी खिडकी-दरवाजे उघडून ते गेले. घटनेचे संरक्षण काम करण्याची त्यांची महत्त्वाची भूमिका असते." चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोड मोदक खाण्यासाठी गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
- निवडणूक आयोगावर टीका- पुढे खासदार राऊत म्हणाले,"निवडणूक आयोग स्वतंत्र राहिलेला नाही. एका मतदारसंघात गुंडाच्या टोळ्या मतदारांना रोखतात. असे अनेक ठिकाणी झाले आहे. निवडणूक आयोगाला अनेकवेळा चुका दाखवूनही निवडणूक आयोगाचे प्रमुख आपलीच भूमिका पुढे रेटतात."
हेही वाचा-
- अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ; पहिल्यांदाच एकही आमदार आला नाही निवडून
- महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात उतरणार मैदानात ? ; काँग्रेसनं दिल्लीत रणशिंग फुंकल्यानंतर राज्यातील नेतेही सरसावले