मुंबई- नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती करत नवीन वर्षाचे गिफ्ट दिलं आहे. तर आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
नव्या वर्षात सरकारकडून अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट; 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - MAHARASHTRA 8 IAS OFFICERS TRANSFER
नवीन सरकार आल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत.
Published : Jan 1, 2025, 11:19 AM IST
सुरज मांढरे हे यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव होते. त्यांची बदली कृषी आयुक्त पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे. याचबरोबर सचिंद्र प्रताप सिंग यांची शिक्षण आयुक्त पुणे येथे नियुक्ती झाली आहे. रवींद्र बिनवडे यांची बदली नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अधिकारी रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. जयवंशी हे आता अल्पसंख्यांक विभाग मंत्रालय येथे सचिव म्हणून काम करतील. यापूर्वी ते राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान, नवी मुंबई येथे कार्यरत होते. त्यांना आता राज्य सरकारनं पदोन्नती दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक ए. बी. धुळाज यांनाही पदोन्नती दिली आहे. समग्र शिक्षण अभियानाचे संचालक विमला आर यांना सुद्धा पदोन्नती देण्यात आली आहे. शितल तेली-उगले सोलापूर पालिकेच्या आयुक्त पदावर त्यांची वेतनश्रेणीत उन्नत करून पदोन्नती देण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना पदोन्नती-आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनाही राज्य सरकारने पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच सोनिया सेठी यांनादेखील पदोन्नती देण्यात आली आहे. त्या सध्या महसूल आणि वन विभाग मंत्रालय येथे प्रधान सचिव होत्या. त्या अपर प्रमुख्य सचिव म्हणून काम करणार आहेत. रणजीत सिंह देओल यांची प्रधान सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे. तसेच माणिक गुरसाळ यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. अधिकारी प्रदीप पी. हे यापूर्वी खादी आणि ग्रामोद्योग मंडळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली आयुक्त मच्छ व व्यवसाय मुंबई येथे करण्यात आली आहे. याशिवाय डॉ. प्रशांत नारनवरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते महिला व बालविकास पुणे येथे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. डॉ. अशोक करंजकर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
8 आयएएस अधिकाऱ्यांकडे ही असणार नवी जबाबदारी
- अल्पसंख्याक विकास विभागात सचिव - रुचेश जयवंशी
- पुण्याचे नवे शिक्षण आयुक्त-सचिनचंद्र प्रताप
- मुद्रांक शुल्क महानिरीक्षक -रवींद्र बिनवडे
- कृषी आयुक्त-सूरज मांढरे
- मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त-प्रदीप पी
- सामान्य प्रशासन विभागात सचिव, विशेष तपास अधिकारी -प्रशांत नारनवरे
- शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रधान सचिव - रणजितसिंग देओल
- महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक -अशोक करंजकर