मुंबई Elementary Intermediate Exam Result :महाराष्ट्र एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा 2023 चा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार doa.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतात. या दोन्ही परीक्षा 4 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेबद्दल : महाराष्ट्र एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत सप्टेंबरनंतर घेण्यात येणारी वार्षिक परीक्षा आहे. ही परीक्षा सहावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी खुली असते. या परीक्षेतून मिळालेले गुण हे ललित कला, कमर्शियल आर्ट्स, टेक्सटाईल डिझाइन, फॅशन डिझाईन तसेच इंटिरियर डिझाइन यासारख्या कलेच्या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आणि अनेकदा तर अनिवार्य मानले जातात.
महाराष्ट्र एलिमेंटरी परीक्षेचा निकाल कसा तपासायचा :
- सर्वप्रथम, dge.doamh.in या DoA महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- मुख्यपृष्ठावर, "Elementary Drawing Grade Exam 2023 Merit List" असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- निकालाची PDF स्क्रीनवर येईल.
- त्यामध्ये तुमचं नाव आणि रोल नंबर तपासा.
- PDF डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या.