महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विप्रो कंपनीच्या कामगाराची भर रस्त्यातच निर्घृण हत्या; आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू - Breaking News Live - BREAKING NEWS LIVE

Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking News (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 7:44 AM IST

Updated : Jun 24, 2024, 7:17 PM IST

Maharashtra Breaking News Live Updates : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

7:16 PM, 24 Jun 2024 (IST)

विप्रो कंपनीच्या कामगाराची भर रस्त्यातच निर्घृण हत्या

ठाणे : एका 25 वर्षीय विप्रो कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा भर रस्त्यातच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथच्या ऑर्डन्स फॅक्टरी परिसरात असलेल्या अंबर चौकात घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपींचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सचिन भोसले असे निर्घृण हत्या झालेल्या कामगाराचं नाव आहे.

6:16 PM, 24 Jun 2024 (IST)

पिपाणी चिन्ह गोठवण्याबाबत शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वात जास्त स्ट्राईक रेट मिळवळा असून पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधात अपक्ष उमेदवारांना दिले गेलेल्या पिपाणीसारखे दिसणारे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाला फटका बसला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह आयोगाच्या यादीतून वगळण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केल्याची माहिती समोर येत आहे.

3:47 PM, 24 Jun 2024 (IST)

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलन आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलन आक्रमक

डॉ.रमेश तारख यांना फासलं काळं

डॉ.रमेश तारख हे मागील चार महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करत होते.

आज झुंजार छावाचे काही पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांचा पहिला सत्कार केला त्यानंतर अचानक त्यांच्या तोंडावरती काळ फासले आहे.

यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनास विरोध करू नये असे देखील ताकीद त्यांनी दिली.

12:46 PM, 24 Jun 2024 (IST)

मराठी लोकांसाठी नवीन इमारतींमध्ये ५० टक्के घरे आरक्षित ठेवा-अनिल परब

मुंबई- मराठी लोकांसाठी नवीन इमारतींमध्ये ५० टक्के घरे आरक्षित ठेवा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घरे नाकारण्याच्या समस्येचे निराकरण करणे हे आपल्या विधेयकाचे उद्दिष्ट असल्याचे आमदार अनिल परब यांनी म्हटलं. मुंबईसारख्या शहरात मांसाहार करणाऱ्या आणि एका विशिष्ट धर्माच्या आधारावर कोणालाही घरे नाकारता येणार नाहीत. मुंबईत मराठी लोकांची लोकसंख्या कमी होत आहे, त्यामुळे याबाब तातडीने कायदा करण्याची गरज असल्याने आपण अशासकीय विधेयक विधानसभा सचिवालयाकडे दिले असल्याची माहिती आमदार अँड अनिल परब यांनी दिली.

12:35 PM, 24 Jun 2024 (IST)

पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळा- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई- लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे झालेल्या अडचणीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं, अशी शरद पवार गटाची मागणी आहे. पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेत शरद पवार गटाला काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहण्यात आले. निवडणूक आयोगानं योग्य तो निर्णय न घेतल्यास शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

12:07 PM, 24 Jun 2024 (IST)

पंतप्रधान मोदींनी घटना बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून इंडिया आघाडीचे आंदोलन- मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी घटना बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. इथे गांधी पुतळा होता. पण त्यांनी लोकशाहीचे सर्व नियम मोडले आहेत. काँग्रेसच्या काळातील आणीबाणीबाबत पंतप्रधान मोदींनी टीका केली. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणाले, "पंतप्रधान हे आणीबाणी जाहीर न करता आणबीणी करत आहेत."

12:06 PM, 24 Jun 2024 (IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह मंत्र्यांनी घेतली शपथ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू किंजरापू, केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार सर्बानंद सोनोवाल यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

11:17 AM, 24 Jun 2024 (IST)

भाजपानं महात्मा गांधींचा पुतळा हटविणं अस्वीकारार्ह-काँग्रेस

काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, " महात्मा गांधी हे संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक आहेत. ज्या पद्धतीनं भाजपानं महात्मा गांधींचा पुतळा हटविला, ते अस्वीकारार्ह आहे. भाजपानं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा पुतळा कोपऱ्यात हलवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला." दरम्यान, संसदेबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निदर्शने केली.

11:09 AM, 24 Jun 2024 (IST)

लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी घेतली खासदारकीची शपथ

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू झाला. पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. पहिले दोन दिवस खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

11:01 AM, 24 Jun 2024 (IST)

पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. ⁠केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांचे निलंबन झाले. तर सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली.

10:31 AM, 24 Jun 2024 (IST)

सर्वांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवू-पंतप्रधान नरेंद्र मोदी

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत आगमन झाले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, "संसदीय लोकशाहीत आजचा गौरवशाली दिवस आहे. नव्या खासदारांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. संसदेत तरुण खासदार जास्त आहेत. देशातील जनतेनं तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली. सर्वांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवू. देश चालविण्यासाठी सर्वांनी सहकार्य महत्त्वाचं आहे."

10:07 AM, 24 Jun 2024 (IST)

संसदेत मोदी आणि शाह यांचा आवाज घुमणार नाही-संजय राऊत

संसदेत मोदी आणि शाह यांचा आवाज घुमणार नाही. संसदेत आता इंडियाच्या नेत्यांचा आवाज घुमणार आहे. २४० ते २७५ खासदार कधी होतील, हे मोदींना कधी कळणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

9:59 AM, 24 Jun 2024 (IST)

प्रो टेम लोकसभा अध्यक्षाची नियुक्ती हा इतिहासात कधीच प्रश्न नव्हता-किरेन रिजिजू

लोकसभेचे अधिवेशन आज होणार आहे. अधिवेशनापूर्वी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "मी सर्व नेत्यांना भेटलो. द्रमुक संसदीय पक्षाचे नेते टी.आर. बालू यांची भेट घेतली. भारतीय संसदेच्या इतिहासात प्रोटेम स्पीकर नियुक्तीचा मुद्दा कधीच नव्हता, यावर आमचे मत आहे. प्रो टेम लोकसभा अध्यक्ष हा मुळात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे आणि नवीन सभापती निवडीसाठी मदत करतो."

8:17 AM, 24 Jun 2024 (IST)

इस्रायल-पॅलेस्टाईनमधील युद्ध लवकरच थांबणार

जेरुसलेम- इस्रायल-पॅलेस्टाईनमधील युद्ध लवकरच थांबणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध थांबणार असल्याचे सांगितले. ते इस्रायलमधील एका वृत्तवाहिच्या मुलाखतीत बोल होते. "संपूर्ण गाझा पट्टीतील युद्ध लवकरच संपणार नाही. मात्र, गाझा पट्टीत हमासविरुद्धचा लढा सुरुच राहणार आहे."

8:04 AM, 24 Jun 2024 (IST)

भेसळयुक्त दारू पिल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 57 वर, अजूनही काही जण रुग्णालयात दाखल

तामिळनाडूमधील कल्लाकुरिची जिल्ह्यात भेसळयुक्त दारू पिल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 57 वर पोहोचली आहे. दारूमध्ये शरीराला अत्यंत अपायकारक असलेल्या मिथेन मिसळल्यानं अनेक नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. काही जणांवर कल्लाकुरिची मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jun 24, 2024, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details