महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील 50 मतदारसंघात फाईट; कोणाची कॉलर होणार टाईट? अवघ्या काही वेळातच निकाल होणार स्पष्ट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर आता राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

ASSEMBLY ELECTION RESULT 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2024, 10:01 PM IST

Updated : Nov 23, 2024, 9:30 AM IST

मुंबई :विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच जाहीर होणार असून, अटीतटीची लढत असणाऱ्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय होणार, याबाबतचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. निवडणूक निकालावेळी राज्यातील 50 'हाय व्होल्टे'ज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे.

  • बारामती :बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अजित पवारांना यावेळी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं होतं.
  • इंदापूर : राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार यांनी भाजपामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे खेचले. मागील १० वर्षांपासून आमदार असलेल्या दत्तात्रय भरणे यांना अनुभवी हर्षवर्धन पाटील यांनी आता आव्हान दिलं होतं.
  • आष्टी : मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे विरुद्ध अपक्ष भीमराव धोंडे असा सामना झाला. 2019 मध्ये बाळासाहेब आजबे विजयी झाले होते.
  • तासगाव-कवठे महंकाळ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आव्हान दिलं होतं.
  • इस्लामपूर :मतदारसंघात सलग 35 वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यंदा अजित पवार यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना पक्षात घेऊन जयंत पाटलांविरोधात उमेदवारी दिली.

राज्यातील 50 'हाय व्होल्टे'ज लढती

क्रमतदारसंघमहायुतीमहाविकास आघाडीअपक्ष/इतर
1नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीसप्रफुल्ल गुडधे
2कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदेकेदार दिघे
3मुंब्रा-कळवानजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड
4दिंडोशीसंजय निरुपम सुनिल प्रभू
5कांदिवली पूर्वअतुल भातखळकर कालू बढेलिया
6घाटकोप पश्चिमराम कदम राम भदाणे
7वरळीमिलींद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे(मनसे)
8बुलडाणासंजय गायकवाड जयश्री शेळके
9माहिमसदा सरवणकर महेश सावंत अमित ठाकरे(मनसे)
10बडनेरारवी राणा सुनिल खराटे
11मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील रोहिणी खडसे
12तिवसाराजेश वानखेडे यशोमती ठाकूर
13काटोलचरणसिंह ठाकूर सलील देशमुख
14कामठीचंद्रशेखर बावनकुळे सुरेश भोयर
15बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार संतोषसिंह रावत
16ब्रह्मपुरीकृष्णलाल सहारे विजय वडेट्टीवार
17भोकरश्रीजया चव्हाण तिरुपती कदम-कोंडेकर
18औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट राजू शिंदे
19येवलाछगन भुजबळ माणिकराव शिंदे
20दिंडोरीनरहरी झिरवाळ सुनिता चारोस्कर
21पालघरराजेंद्र गावित जयेंद्र दुबळा
22ओवळा माजीवडाप्रताप सरनाईक नरेश मणेरा संदीप पाचंगे(मनसे)
23ठाणेसंजय केळकर राजन विचारे अविनाश जाधव(मनसे)
24मागाठणेप्रकाश सुर्वे उदेश पाटेकर नयन कदम(मनसे)
25विक्रोळीसुवर्णा करंजे सुनील राऊत विश्वजीत ढोलम(मनसे)
26जोगेश्वरी पूर्वमनिषा वायकर अनंत(बाळा)नर भालचंद्र अंबुरे(मनसे)
27कांदिवली पूर्वअतुल भातखळकर कालू बढेलिया महेश फरकासे(मनसे)
28घाटकोपर पश्चिमराम कदम संजय भालेराव
29मानखुर्द शिवाजीनगरनवाब मलिक अबु आझमी जगदीश खांडेकर(मनसे)
30वांद्रे पूर्वझिशान सिद्दीकी वरुण सरदेसाई तृप्ती सावंत(मनसे)
31वांद्रे पश्चिमआशिष शेलार असिफ झकेरिया
32वरळीमिलिंद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे(मनसे)
33शिवडीनाना अंबोले अजय चौधरी बाळा नांदगांवकर(मनसे)
34भायखळायामिनी जाधव मनोज जामसुतकर
35मलबार हिलमंगलप्रभात लोढा भैरुलाल चौधरी
36कसबा पेठहेमंत रासने रवींद्र धंगेकर गणेश भोकरे(मनसे)
37कर्जत जामखेडराम शिंदे रोहित पवार रवींद्र कोठारी(मनसे)
38लातूर ग्रामीणरमेश कराड धीरज देशमुख संतोष नागरगोजे(मनसे)
39कराड दक्षिणअतुल भोसले पृथ्वीराज चव्हाण
40पाटणशंभुराज देसाई हर्षल कदम सत्यजितसिंह पाटणकर (अपक्ष)
41गुहागरराजेश बेंडल भास्कर जाधव प्रमोद गांधी(मनसे)
42रत्नागिरीउदय सामंत सुरेंद्र माने
43राजापूरकिरण सामंत राजन साळवी
44कणकवलीनितेश राणे संदेश पारकर
45कुडाळनिलेश राणे वैभव नाईक
46सावंतवाडीदीपक केसरकर राजन तेली
47रिसोडभावना गवळी अमित झनक
48जामनेरगिरीश महाजन दिलीप खोडपे
49श्रीवर्धनअदिती तटकरे अनिल नवघणे फैजल पोपेरे
50परांडातानाजी सावंत राहुल मोटे राजेंद्र गपाट
पक्षउमेदवार संख्यामहिला उमेदवार संख्या
भाजपा14917
काँग्रेस1017
शिवसेना (उबाठा)95 10
राष्ट्रवादी59 5
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)86 11
शिवसेना81 8

4136 उमेदवार रिंगणात : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. एकूण 4136 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील 3771 पुरुष, तर 363 महिला उमेदवार होत्या. राज्यातील 234 हे General मतदारसंघ असून, 'एससी'साठी 29 आणि 'एसटी'साठी 25 मतदारसंघ हे राखीव आहेत. राज्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वाधिक कमी म्हणजेच तीन उमेदवार हे शहादा विधानसभा मतदारसंघात होते.

हेही वाचा

  1. ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; सत्ता स्थापनेत नेमकी अडचण काय?
  2. राज्यात सहा जागांवर रंगतदार लढत, बालेकिल्ला वाचवण्याचे पवार अन् शिंदेंपुढे आव्हान
Last Updated : Nov 23, 2024, 9:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details