महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणीसह, 'मिनी काश्मीर' पर्यटकांनी फुललं, पर्यटनस्थळी तगडा बंदोबस्त - MAHABALESHWAR PANCHGANI

मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गिरीस्थान पाचगणीसह महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालं आहे.

Mahabaleshwar
महाबळेश्वर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2024, 10:33 PM IST

सातारा :नाताळची सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी 'मिनी काश्मीर' अर्थात महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. हॉटेल्स, लॉज, फार्म हाऊसेस, खासगी बंगले, खासगी रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल झाली आहेत. ही गर्दी आठवडाभर कायम राहणार आहे.



विविध पॉइंट्स आणि वेण्णा लेकवर गर्दी: महाबळेश्वरमधील विविध पॉइंट्स आणि वेण्णा लेकवर पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. याशिवाय धार्मिक-ऐतिहासिक स्थळे आणि बाजारपेठ देखील पर्यटकांनी फुलून गेली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने महाबळेश्वरकडं येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. शनिवारपासून पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.


पाचगणीचं टेबल लँड गजबजलं :ऐन थंडीच्या मोसमात येणाऱ्या नाताळ सणाची सुट्टी, मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक एक-दोन महिने आधीच हॉटेल, लॉजसह रिसॉर्ट्सचं बुकींग करतात. नववर्षाचे औचित्य साधत अनेक रिसॉर्टवर नाताळ, विविध थीम आणि गेमचं आयोजन करून पर्यटकांना आकर्षित करण्यात आलं आहे. ब्रिटिशकालीन चर्च आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाले आहेत. नाताळबाबाची प्रतिकृती, सजवलेले ख्रिसमस ट्री मुलांचं आकर्षण ठरत आहेत.



स्ट्रॉबेरीची खरेदी, कणसांवर ताव: महाबळेश्वरची लालचुटुक स्ट्रॉबेरी पर्यटकांना भुरळ घालत आहे. शेतात जाऊन पर्यटक स्ट्रॉबेरी खरेदी करताना दिसत आहेत. तसेच कडाक्याच्या थंडीत मक्याच्या गरमागरम कणसावर ताव मारत आहेत. स्वेटर, मफलर, कानटोपी घालून पहाटे पर्यटक महाबळेश्वरच्या थंडीचा आस्वाद घेत आहेत. तसंच रात्री खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.



सातारा जिल्ह्यात तगडा बंदोबस्त : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं जल्लोषात स्वागत करत असताना अनुचित प्रकार घडू नये, म्हणून महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, तापोळा, बामणोलीसह महत्वाच्या ठिकाणी ९७ पोलीस अधिकारी, १३०३ पोलीस कर्मचारी आणि ५०० होमगार्डस, असा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मद्यपी वाहन चालकांच्या तपासणीसाठी ३३ ब्रीथ ॲनालायझर मशिन्स देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील पोलिसांची नजर राहणार आहे.

हेही वाचा -

  1. झिंगाट सेलिब्रेशन : तळीरामांना ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालकच सोडणार घरी; पुणे हॉटेल्स असोसिएशनचा निर्णय
  2. कोल्हापुरात बनणाऱ्या मटण लोणच्याचा साता-समुद्रापार घमघमाट : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाढली मागणी
  3. मुंबईतील ‘हे’ शांत बीच तुम्हाला माहीत आहेत का? जिथे निवांतपणे तुम्ही ईयर एन्डींग सेलिब्रेशन करू शकता

ABOUT THE AUTHOR

...view details