मुंबई Lok Sabha Election Results 2024:राज्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाची 39 ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणा तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिली आहे.
सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर मतमोजणीविषयी सांगताना (ETV Bharat Reporter) मतमोजणी सज्जता :चार जूनला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सर्वत्र सुरुवात होईल. यासाठी 39 ठिकाणी असलेल्या 48 मतमोजणी केंद्रांवर 20 हजार 725 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणी केंद्रांवर राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे.
सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी :राज्यातील मतमोजणी केंद्रावर सुरुवातीला पोस्टाद्वारे करण्यात आलेल्या मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 2 लाख 56 हजार 898 इतक्या अंदाजे पोस्टल मतांची ही मोजणी होणार आहे. त्यानंतर त्यानंतर 98,140 मतदान केंद्रांवरील 1 लाख 97 हजार 45 बॅलेट युनिट आणि 98 हजार 140 कंट्रोल युनिट तसेच 98,140 व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक फेरीतील गणिक आकडेवारी जाहीर करण्यात येईल. दुपारी बारा वाजेपर्यंत साधारण कल लक्षात येईल आणि रात्री आठ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे पारकर यांनी सांगितले. मतमोजणीच्या साधारण 25 ते 28 फेऱ्या होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्याने मतमोजणीच्या फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
- दरोडा टाकलेल्या घरात थंडगार एसीच्या हवेत झोपलेल्या चोराला पोलिसांच्या दांडक्यानंच आली जाग, वाचा पुढे काय घडलं? - thief in Lucknow
- राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र - Sharad Pawar On CM Eknath Shinde
- "निवडणूक आयोग भाजपाची शाखा असल्यासारखा...", संजय राऊतांचा हल्लाबोल - Lok Sabha election results 2024