मुंबईLok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता 2019 च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीय. तर ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची (Transgender Voters) नोंद झालीय.
ठाण्यात सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद : 2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. 2019 मध्ये म्हणजे आणखी पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीनं वाढला होता आणि ही संख्या 2,086 इतकी झाली होती. आता तर यावर्षी म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजीपर्यंत करण्यात आलेल्या राज्याच्या एकूण मतदार संख्येत 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत. यावेळी सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आलीय. 1 हजार 279 तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमध्ये 812 आणि पुण्यात 726 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.