अमृतसर: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या आवारात अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारातून शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हे थोडक्यात बचावले आहेत.
अज्ञात व्यक्तीनं माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज सकाळी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. सतर्क असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार सुखबीर सिंग बादल हे सुवर्ण मंदिरात बजाविलेल्या धार्मिक शिक्षेनुसार 'सेवा' करत होते. यावेळी हल्लेखोर बादल यांच्याजवळ पोहोचला. त्यानं लपवलेले पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, were offering 'seva'. The attacker, identified as Narayan Singh Chaura by the Police has been overpowered by the people and caught.
— ANI (@ANI) December 4, 2024
(Video Source: PTC News) pic.twitter.com/b0vscrxIL8
सुदैवाने हल्लेखोराकडून झाडण्यात आलेली गोळी बादल यांना लागली नाही. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचे लोक आले. त्यांनी हल्लेखोराला पकडले. त्यानंतर सुरक्षा कर्मचारीही तेथे धावले. लोकांनी हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी करण्यासाठी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. अद्याप, हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. अज्ञात व्यक्तीनं कशासाठी हल्ला केला? याचे अद्याप कारण समजू शकले नाही.
- एडीसीपी हरपाल सिंग म्हणाले,"मंदिरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती. त्यांना पुरेसे संरक्षण देण्यात आले होते. हल्लेखोर सिंग चौरा हा कालदेखील आला होता. आजही तो आला होता. त्यानं प्रथम गुरुंचे दर्शन घेतले."
3 डिसेंबरला ठोठावली होती शिक्षा- सुखबीर सिंग बादल हे उपमुख्यमंत्री असताना 2007 ते 2017 या कालावधीत धार्मिक गैरवर्तन केल्याचा ठपका अकाल तख्तकडून ठेवण्यात आला आहे. धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना स्वच्छता गृह साफ करण्याची आणि भांडी धुण्याची शिक्षा देण्यात आली आहे. सुखबीर सिंग बादल यांनी शिक्षेच्या पहिल्या दिवशी दरबार साहिबच्या बाहेर पहारेकऱ्याची भूमिका पार पाडली. ते निळ्या रंगाचे कपडे घालून व्हीलचेअरवर बसले होते. त्यांनी शिक्षेच्या पहिल्या दिवशी भक्तांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयाची स्वच्छतादेखील केली. तसेच लंगरमध्ये 1 तास भांडी स्वच्छ केली. सकाळी 9 ते 10 दरबार साहिबबाहेर बसण्याची शिक्षा ठोठावली होती.
हेही वाचा-