सातारा : घटना समितीचे पहिले अध्यक्ष, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती (३ डिसेंबर) देशभरात 'वकील दिवस' म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी कराड कोर्टातील वकिलांच्या प्रसंगावधानाने एका पक्षकाराला जीवदान मिळालं.
पक्षकाराला आला हार्टॲटॅक : देशभरात मंगळवारी 'ॲडव्होकेटस् डे' साजरा झाला. याच दिवशी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हार्ट अटॅक येऊन एक पक्षकार जागीच कोसळला. वकीलांनी त्यांना प्रथमोपचार देऊन कारमधून तातडीनं दवाखान्यान नेलं. वेळीच उपचार मिळाल्यानं आणि वकीलांच्या प्रसंगावधानानं त्यांचा जीव वाचला. जयवंत पोळ (वय ६५, रा. हजारमाची, ता. कराड), असं पक्षकाराचं नाव आहे.
वकीलांनी पक्षकाराला नेलं हॉस्पिटलमध्ये : घटना समितीचे पहिले अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती मंगळवारी 'वकील दिवस' म्हणून साजरी करण्यात आली. याच दिवशी कोर्टाच्या आवारात जयवंत पोळ नावाचा पक्षकार अचानक खाली कोसळला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या ॲड. महादेव साळुंखे, ॲड. अनिकेत भोपते यांनी त्याच्या छातीवर दाब देऊन त्यांना सावध केलं. तसेच ॲड. विशाल शेजवळ यांनी आपल्या कारमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
वेळेत मिळाले वैद्यकीय उपचार : हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या तातडीने प्राथमिक चाचण्या केल्या. त्यांना हार्ट अटॅक आल्याचं स्पष्ट झालं. समयसूचकता दाखवणाऱ्या वकीलांपैकी ॲड. महादेव साळुंखे यांनी त्या पक्षकाराची प्राथमिक माहिती काढली असता जयवंत पोळ यांची केस ॲड. सी. बी. कदम यांच्याकडं होती. तो पक्षकारही त्या वकीलांच्याच गावचा असल्यानं ॲड. कदम यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवलं.
वकीलांच्या तत्परतेची कोर्टात चर्चा : देशभरातील न्यायालयांमध्ये मंगळवारी 'वकील दिन' साजरा होत असताना कराडमधील वकीलांनी हार्ट अटॅक आलेल्या पक्षकाराचा जीव वाचवला. त्याचा वकील कोण, हे न पाहता माणुसकी आणि कर्तव्य भावनेचं दर्शन घडवलं. त्यामुळं वकीलांमध्ये या घटनेची दिवसभर चर्चा होती. समयसूचकता दाखविणाऱ्या वकीलांचं कराड बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कौतुक केलं.
हेही वाचा -