नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची मंगळवारी दिल्लील भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पटोले यांनी महायुतीवर टीका केली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, " महायुती सरकार जनतेच्या मतांमुळे जिंकले नाही. तर दिल्लीत भाजपावाले बसले आहेत. त्यांच्यामुळे महायुती जिंकली आहे". महायुती सरकार जनतेच्या मतांनी निवडून आलेले नाही. दिल्लीत बसलेल्या भाजपाच्या लोकांमुळे महायुती सरकार स्थापन झालं. त्यांना लोकांची फिकीर नाही. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून ते काय निर्णय घेतात ते पाहू".
कोणते तीन प्रश्न काँग्रेसनं केले उपस्थित?
- नाना पटोले म्हणाले, "मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली, हा आम्ही पहिला मुद्दा उपस्थित केला. मतदारांची नावे हटविण्याच्या प्रक्रियेसाठी विहित फॉर्म आणि प्रक्रियांचे पालन करणं आवश्यक आहे. ते आम्हाला समजण्यासाठी बूथ-निहाय आणि मतदारसंघनिहाय तपशीलवार डेटा आवश्यक आहे. मात्र, मतदारांची नावे काढून टाकण्यात आल्याचा डाटा सध्या उपलब्ध नाही".
- "आमचा दुसरा मुद्दा मतदार यादीत नवीन नावे जोडण्याबाबत आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका पाच महिन्यांनी होताना सुमारे पाच महिन्यांत सुमारे 47 लाख मतदारांची नावे जोडण्यात आली आहेत. या जोडण्यांसाठीचे फॉर्म कोठे आहेत? कोणत्या आधारावर नावे जोडण्यात आली आहेत? मतदारांच्या नावांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली आहे. आम्हाला जोडण्यात आलेल्या 47 लाख मतदारांचा कच्चा डाटा हवा आहे".
- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सात टक्क्यांच्या वाढलेल्या मतदानाबाबतही काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडं प्रश्न उपस्थित केला.
घटनेच्या मूलभूत पायभूत संरचनेला धक्का?राज्यसभेचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांची भेट घेतली. माध्यमांना संबोधित करताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 47 लाख मतदारांची नावे यादीत जोडण्यात आल्याचा आरोप केला. " निवडणुका योग्य रीतीनं घेतल्या नाहीत तर घटनेच्या मूलभूत पायभूत संरचनेला धक्का बसतो. निवडणूक आयोगानं आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांप्रमाणे आकेडवारी काढून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सत्य माहिती द्यावी. त्याच्या आधारावर आम्ही निष्कर्ष काढणार आहोत".
हेही वाचा-