अहमदनगर Lok Sabha Election 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (13 मे) पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला असून सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावताना दिसत आहे. तर पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देखील अनवाणी अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.
सर्वांनी मतदान करावं : गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क अकोले तालुक्यातील कोंभाळणे या त्यांच्या जन्मगावी बजावला. रांगेत उभं राहून लोकशाहीचा आदर करत त्यांनी सन्मानपूर्वक आपला मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पायातील चपलाचे जोडे बाजूला ठेवत अनवाणी पायानं जात पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता. त्याचप्रमाणे आज आपला मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी आपले पायातील जोडे मतदान केंद्राच्या बाहेर काढत लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात आपल्या परंपरा जतन करत सहभाग नोंदवला. तसंच यावेळी ईटीव्ही भारतशी संवाद साधतांना त्यांनी, सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन केलं.