महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवारांचा दावा - Shivani Wadettiwar Claim

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्तानं बाहेर आला आहे. बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024 चं तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र या जागेवर आता शिवानी वडेट्टीवार यांनी दावा केला आहे.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 7:36 AM IST

चंद्रपूर Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपाच्या संभावित उमेदवारांची अंतर्गत चुरस चालू आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठीची रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचं नाव चर्चेत असतानाच या जागेवरुन निवडणूक लढण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी दावेदारी सांगितली आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही दावेदारी सांगितली आहे. त्यांनी यासाठी गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.

शिवानी वडेट्टीवार

मागील वेळी काँग्रेसचा केवळ एक खासदार :2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रातून केवळ चंद्रपूर इथं विजय मिळवता आला. बाळू धानोरकर हे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2023 मध्ये खासदार बाळू धानोरकर यांचं आकस्मिक निधन झालं आणि ही जागा रिक्त झाली. ही जागा त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळणार हे जवळपास जवळपास निश्चित होतं. प्रतिभा धानोरकर यांनी आपण ही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचंही सांगितलं होतं. मात्र याच दरम्यान वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी या जागेवर आपली दावेदारी सांगितली. मागील सात वर्षांपासून आपण पक्षाचं काम करत आहोत. त्यामुळं आपल्याला तिकीट देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिभा धानोरकर

काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार कलह :बाळू धानोरकर आणि विजय वडेट्टीवार कलह हा काही पक्षात नवा नाही. बाळू धानोरकर असताना वडेट्टीवार आणि धानोरकर यांचे मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुद्द्यावरून त्यांचं शीतयुद्ध शिगेला पोचलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर असे दोन गट पडले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गट स्वतंत्र लढले होते. यावेळी देखील त्यांच्यातले वाद चव्हाट्यावर आले होते. धानोरकर यांनी वडेट्टीवारांच्या विरोधात रोख भूमिका घेतली होती. वडेट्टीवार यांच्या गटानं भाजपाच्या गटाशी थेट युती केल्यानं वडेट्टीवार यांच्या गटातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदावरून हकालपट्टी केली होती. यानंतर मे 2023 मध्ये खासदार बाळू धानोरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. त्यांच्यानंतर ही जागा त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळणार हे जवळपास निश्चित समजलं जात होतं. मात्र याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला आहे.

धानोरकर आणि वडेट्टीवार गटाचा संघर्ष :"आपण मागील सात वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहो. आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी नवमतदारांपासून ज्येष्ठांची मागणी आहे. त्यामुळे आपण लढण्यास इच्छुक आहे," असं शिवानी वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. तिकीट कुणाला मिळणार हे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. मात्र त्या आधीच उमेदवारीबाबत दावे केले जात आहे. प्रतिभा धानोरकर यांनी यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या निवडणुकीत धानोरकर आणि वडेट्टीवार गटाचा संघर्ष बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. "लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही, पण..."; सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
  2. चंद्रपूर लोकसभा 2024 : भाजपकडून 'यांची' नावे आहेत चर्चेत
  3. 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details