महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोयता गँगची दहशत : कोयत्यानं हल्ला करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, सात जणांना अटक - Koyta attack on traders

Koyta attack on traders : मुंबईतील व्यापाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या सात जणांना माटुंगा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. यातील एक आरोपी यापूर्वी आंगडिया म्हणून कामाला होता. त्यामुळं सोने व्यापाऱ्यांची त्याला माहिती होती. त्यावरून आरोपींनी दरोड्याचा कट रचला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेऊन उर्वरित चौघांचा शोध घेऊन त्यांना सातारा येथून अटक केली.

Representative photograph
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 10:07 PM IST

मुंबईKoyta attack on traders :पुण्यातील कोयता गॅंगनं मुंबईतील व्यापाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी दादरमध्ये घडली. या प्रकणात माटुंगा पोलिसांनी तिघांना जागेवर अटक केली असून चार आरोपींना आज साताऱ्यातून अटक करण्यात आल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली आहे. याप्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपी कोयता गॅंगचे सदस्य : अटक करण्यात आलेले हल्लेखोर पुण्यातील कोयता गॅंगचे सदस्य आहेत. त्यातील एक आरोपी शिक्षण घेत असून दोघे जण खासगी कंपनीत नोकरीला आहेत. या टोळीकडून दोन महागड्या मोटारसायकल, कोयता जप्त करण्यात आला आहे. आज अटक करण्यात आलेले चौघे पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे राहणारे आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्यावर सायन रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आलं आहे. गौरव राजेंद्र ढमाल (वय 23), ओमकार संपत घोलप (वय 23), तेजस कृष्णाजी जाधव (वय 24), रणजित कुडाळकर, साहिल खडसर (वय 23) असं अटक करण्यात आलेल्या कोयता गॅंगच्या सदस्यांची नावे आहे.

डिलिव्हरी बॉयचा पाठलाग : एका सराफाचे अडीच किलो चांदी घेऊन अंगडिया कर्मचारी रत्नागिरीवरून येत असल्याची माहिती टोळीला मिळाली होती. त्यावरून टोळीनं सराफाच्या बसचा पाठलाग करत डिलिव्हरी बॉयला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दादर टीटी सर्कल येथे गुरुवारी सकाळी 6:45 वाजता घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपींना अटक केली. या हल्ल्यात डिलिव्हरी बॉय विजय दशरथ निंबाळकर (वय 36) जखमी झाला आहे. निंबाळकर हा मूळचा सातारचा रहिवासी आहे. तो रत्नागिरी येथून महालक्ष्मी अंगडिया कुरियर, भुलेश्वर यांची अडीच किलो चांदीसह ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होता. तेथेच एका हॉटेलसमोर चहापान करत असताना दोन बाइकवरून आलेल्या चौकडीनं लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.

सात जणांना अटक :लूट करताना आरडाओरड होताच माटुंगा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. मात्र, त्यातील एकानं धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी निंबाळकर यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) उपचारासाठी दाखल केलं. तसंच ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींच्या तपासादरम्यान पोलिसांना आणखी चार आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, कॉन्स्टेबल नथुराम चव्हाण, कॉन्स्टेबल अनिल उंडे, महेंद्र तांबे यांच्या पथकानं चारही आरोपींचा शोध घेतला. खबऱ्याच्या माहितीवरून आरोपी साताऱ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली.

'हे' वाचलंत का :

  1. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Convict in rape gets 20 years
  2. बारामतीत धक्कादायक घटना.. थेट डोक्यात झाडली गोळी, पाच जणांवर गुन्हा दाखल. - Shocking incident in Baramati
  3. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार, आपण बुलडोझर बाबा नसल्याचं केलं स्पष्ट - Drug free Maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details