महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River - PANCHGANGA RIVER

Panchganga River : कोल्हापूर शहरात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस (Kolhapur Rain) कोसळत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणी (Panchaganga River Water) पातळीतही वेगानं वाढ झालीय. तर राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवरून वाहत आहे.

Panchganga River
पंचगंगेची पाणीपातळी वाढली (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 4:45 PM IST

Updated : Jul 7, 2024, 5:01 PM IST

कोल्हापूर Panchganga River :जिल्ह्यात धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू (Kolhapur Rain) आहे. यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी (Panchaganga River Water) पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दुपारी 12 वाजता 28 फूट 7 इंच नोंदली गेली.

पंचगंगेची पाणीपातळी वाढली (ETV BHARAT Reporter)

पाणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी : शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्रा बाहेर पडल्यानं आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं आहे. तर परिसरातील पाणी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच NDRF ची एक तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झालीय. त्यासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलंय.

पंचगंगा पाणी पातळीत झपाट्यानं वाढ: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरीसह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं, राधानगरी धरणात 41.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळं धरणाच्या पॉवर हाऊसमधून 1250 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 7 इंचावर: आज दुपारी 12 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 7 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे तर, धोका पातळी 43 फूट इतकी आहे. त्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आले आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पंचगंगा नदीचं पाणी दुपारी 12 च्या सुमारास पात्रा बाहेर पडले. त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे -

पंचगंगा नदी: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती नदी: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे

कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे

हिरण्यकेशी नदी : साळगांव

घटप्रभा नदी: पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी

वारणा नदी: चिंचोली, माणगांव

ताम्रपर्णी नदी: कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर, माणगाव, न्हावेली, उमगाव

दुधगांगा नदी : दत्तवाड

हेही वाचा -

  1. Panchganga River Floods : राधानगरी धरणाचे सात दराचे उघडले; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, सतेज पाटलांचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र
  2. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिका 'ॲक्शन मोडवर'; पंचगंगा नदीत केले प्रात्याक्षिके - Kolhapur News
Last Updated : Jul 7, 2024, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details