महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण; कोरटकर विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल - INDRAJIT SAWANT THREAT CASE

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

INDRAJIT SAWANT THREAT CASE
प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करताना इंद्रजीत सावंत (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 7:50 PM IST

Updated : Feb 25, 2025, 8:13 PM IST

कोल्हापूर :इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी राज्याचा गृह विभाग कोरटकरवर कारवाई करणार का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्राह्मण द्वेष पसरवल्याचा आरोप करत नागपुरातील प्रशांत कोरटकरनं फोनवरून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं कोरटकर याला हे प्रकरण भोवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापुरी पायताणाचा हिसका दाखवू : सोमवारी मध्यरात्री व्हॉट्सअप कॉलवरून प्रशांत कोरटकर यानं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत फोन करत 'छावा' चित्रपटावर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून आपण ब्राह्मण द्वेष पसरवत आहात असा आरोप केला. तसंच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं. या फोनचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन प्रशांत कोरटकर याचा समाचार घेतला. कोरटकर यानं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करत धमकी दिली. यानंतर कोल्हापुरातील विविध संघटना आक्रमक झाल्या. कोरटकर यानं कोल्हापुरात येऊन दाखवावं. त्याला कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद दिला जाईल, असा आक्रमक पवित्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला.

माध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक संजीव झाडे (ETV Bharat Reporter)

जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल :फोनवरून जीवे मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर इथल्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात इंद्रजीत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस कॉल रेकॉर्डची शहानिशा करण्याचं काम करत आहेत. आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय कारवाई करतात? याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी : माथेफिरुनं मुख्यमंत्र्यांच्या जातीचाही केला उल्लेख
  2. इंद्रजित सावंत यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर सोडणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा
  3. 'मी इंद्रजीत सावंतांना ओळखत नाही, त्यामुळे धमकीचा प्रश्नच नाही' : प्रशांत कोरटकर यांची स्पष्टोक्ती
Last Updated : Feb 25, 2025, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details