महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबू भगरे यांची धास्ती; शिक्षक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे नामसाधर्म्य असलेले किशोर दराडे यांना मारहाण - Kishor Darade Beaten

Kishor Darade Beaten : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत डमी उमेदवार बाबू भगरे यांनी तब्बल एक लाख मते घेतल्याने आता उमेदवारांनी धास्ती घेतली आहे. अशा नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नामसाधर्म्य असलेले किशोर दराडे यांना मारहाण करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राडा झाल्याने शिक्षक निवडणूक चर्चेचा विषय ठरला आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 9:52 PM IST

Kishor Darade Beaten
किशोर दराडे (ETV Bharat Reporter)

नाशिकKishor Darade Beaten:नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आज महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर किशोर दराडे यांनी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून किशोर दराडे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीचे किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना माघार घेण्यासाठी दबाव टाकल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

किशोर दराडे हे मारहाण प्रकरणी मत व्यक्त करताना (ETV Bharat Reporter)

किशोर दराडेंचा आरोप :डमी उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले आहे; मात्र कोणी धक्काबुक्की आणि मारहाण केली हे माहीत नसल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. पोलीस संरक्षणात किशोर दराडे यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर मी कोणावरही दबाव टाकला नाही. कोल्हे यांच्याच लोकांनी मारहाण केली असल्याचा पलटवार महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी केला आहे.


बाबू भगरे यांना मिळाली एवढी मते :दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचं नामसाधर्म्य असलेले बापू भगरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं. भास्कर भगरे यांच्या काही विरोधकांनीच बाबू भगरे यांचा प्रचार करीत लोकांना नवव्या क्रमांकाचे बटण दाबण्याचं आवाहन केलं होतं. यात ज्यांना फारसे लिहिता व वाचता येत नाही, अशा मतदारांनी भास्कर भगरे समजून नऊ नंबरचे बटण दाबले. चांदवड, कळवण आणि येवला मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना 1 लाखहून अधिक मते मिळाली आहेत. जर या लढतीत भास्कर भगरे यांचा निसटता पराभव झाला असता तर बाबू भगरेंना भास्कर भगरे कधीही विसरू शकले असते.

हेही वाचा :

  1. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024
  2. कंगना रणौत वादग्रस्त विधानांमुळं असते चर्चेत; उद्धव ठाकरेंशी 'पंगा' घेणं पडलं होतं महागात, वाचा, वाद आणि कंगनाचं नातं - Kangana Ranaut Controversial Statement
  3. राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण; 'या' तारखेला मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ, राज्याला अनेक मंत्रिपदांची आशा - PM Narendra Modi Oath Ceremony

ABOUT THE AUTHOR

...view details