नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. पहिला सामना रविवारी (6 ऑक्टोबर) ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी करत 7 गडी राखून विजय मिळवला.
बांगलादेशची खराब फलंदाजी : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाला केवळ 128 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं अवघ्या 11.5 षटकांत 3 गडी गमावून सामना जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी करत 7 गडी राखून विजय मिळवला.
Hardik Pandya finishes off in style in Gwalior 💥#TeamIndia win the #INDvBAN T20I series opener and take a 1⃣-0⃣ lead in the series 👌👌
— BCCI (@BCCI) October 6, 2024
Scorecard - https://t.co/Q8cyP5jXLe@IDFCFIRSTBank pic.twitter.com/uYAuibix7Q
संजू-अभिषेकची दमदार सुरुवात : बांगलादेशच्या 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ पहिल्याच षटकापासूनच आक्रमक दिसत होता. अभिषेक शर्मानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 16 धावा काढून तो धावबाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यानं एकापाठोपाठ एक 3 शानदार षटकार ठोकले आणि 14 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. संजू सॅमसनही 19 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्यानं 16 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या तर नितीश कुमार रेड्डी यानं 15 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. बांगलादेशकडून एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाला.
.@surya_14kumar was at his best tonight 😎💥#TeamIndia have raced to 65/2 in 5.3 overs 💪
— BCCI (@BCCI) October 6, 2024
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lFi0CE6L9P
बांगलादेशविरुद्ध भारताचा वरचष्मा : भारत आणि बांगलादेशचे यांच्यात भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या 15 वर्षात दोन्ही देशांमध्ये 15 टी-20 सामने झाले आहेत. या काळात बांगलादेश संघाला फक्त एकदाच विजय मिळवता आला. हा सामना 3 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्लीत खेळला गेला. जिथे बांगलादेशी संघ 7 गडी राखून विजयी झाला. गेल्या 5 टी-20 सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, या पाचही सामन्याच भारतानेच विजय मिळवला आहे.
The first of many more! ⚡️
— BCCI (@BCCI) October 6, 2024
📽️ WATCH Mayank Yadav's maiden international wicket 😎
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Q0XvZGBQrq
हेही वाचा