ETV Bharat / state

पोलीस ठाण्यावर दगडफेक करणारे 18 आरोपी अटकेत; 'वर्दी'ला घाबरून अनेक आरोपी 'अंडरग्राउंड' - Stone Pelting at Amravati

दोन दिवसांपूर्वी (4 ऑक्टोबर) अमरावतीमध्ये जमावानं एका पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणी आता आरोपींची धरपकड सुरू आहे.

nagpuri gate police station
अमरावतीमधील पोलीस ठाण्यावर दगडफेक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 9:52 PM IST

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 18 आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींची धरपकड करण्यासाठी 'सर्चिंग ऑपरेशन' सुरू असून, पोलिसांच्या भीतीनं आता शेकडो आरोपी 'अंडरग्राउंड' झाले आहेत.

बाराशे जणांवर गुन्हा दाखल : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील यती नरसिंह नंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अल्पसंख्याक समुदायानं नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपण दिलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही, अशी अफवा काही युवकांनी पसरवली होती. यामुळं शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव एकत्र आला आणि या जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली चव्हाण यांच्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे बाराशे अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडी : नागपुरी गेट पोलीस व गुन्हे शाखेनं एकूण 18 आरोपींना अटक केली. यापैकी 17 आरोपींना रविवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली, तर शनिवारी सकाळी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस उपायुक्त तळ ठोकून : नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर जमावानं दगडफेक केल्यामुळं 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, शनिवार सकाळपासून रविवारी रात्रीपर्यंत पोलीस उपायुक्त सागर पाटील हे नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

हे आहेत अटक करण्यात आलेले आरोपी : अ. साकिब अ. राजीक (२०, सागर नगर), मो. वसीम छोटे साहेब (३१, गौस नगर), मो. बेग रशीद बेग (२७), शेख जुनैद उर्फ गोलु शेख निसार (२४), सैयद इमरान सैयद पाशा (२७), मुस्तकिम शहा शफाकत शहा (३५), शेख तौसिफ शेख नाजीम (२२, सर्व रा. लालखडी), शेख जुनैद शेख युसुफ (२८, इंदला), अनिकेत किशोर सिंग चंदेल (२७, हनुमान नगर), मो. मुजबिल शेख गफुर (२६, अन्सारनगर), असलम खान अहेमद खान (२५), इरफान खान रहेमान खान (३५, दोघेही रा. रहेमत नगर), शेख अहमद शेख इस्माईल (३०, अकबर नगर), मोहसिन खान नसिब खान (२३, गुलजार नगर), सैयद जमिर सैयद जमिल (२८, रा. करजगाव), अ. साजिद अ. साबिर (३०) व लियाकत अली अमानत अली (२८, दोघेही रा. अलिम नगर, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा -

  1. अमरावतीत पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड; बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Stone Pelting Amravati
  2. महायुतीत पडणार खिंडार! अमरावती मतदार संघावर भाजपाचा दावा - Maharashtra Assembly Election 2024
  3. अमरावतीत पोलीस ठाण्यावर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, जमाव बंदीचा आदेश - Stone pelting On Police Station

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.